

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : गेवराई तालुक्यातील पाडोळ्याचीवाडी येथील ४५ वर्षीय व्यक्तीला राहत्या घरात विजेचा धक्का (Electric shock) लागून मृत्यू झाला. पांडुरंग किशन जाधव (वय ४५, रा. पाडोळ्याचीवाडी) असे त्यांचे नाव आहे. ही घटना रविवार रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.
पांडुरंग जाधव रविवार रात्री आपल्या घरात बसले होते. त्यावेळी त्यांचा लोखंडी अँगलला हात लागला. त्यामुळे अँगलमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का (Electric shock) लागून त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचलंत का ?
पाहा व्हिडिओ :