नाशिक : अनकाई किल्ल्याच्या तळ्यात शिर्डी येथील भाविकाचा बुडून मृत्यू

बुडाले
बुडाले
Published on
Updated on

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा : शिर्डी जवळ असलेल्या पिंपरी लोकाई येथून आलेल्या अशोक कानकुटे या 35 वर्षीय तरुणाचा अनकाई किल्ल्याच्या तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

गावातील कावड यात्रेच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या अंकाई किल्ल्यावर तळ्यामधील पाणी घेण्यासाठी (दि. 3) सकाळी सहा वाजेच्या सुमारास दहा ते पंधरा जणांचा गट आला होता. यात अशोक कानकुटे हा तरुण पाणी घेण्यासाठी तळ्यात उतरला असता त्याचा पाय घसरून तो पाण्यात बुडाला. पोहता येत नसल्यामुळे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक नागरिक राजू सिंग परदेशी यांनी दिली आहे.

गावातील ग्रामस्थ व पोलीस पाटील यांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह वर काढण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलिस करत आहे. दरम्यान या तळ्यामध्ये यापूर्वी अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news