नाशिकमध्ये मराठी भाषा भवन उभारणार ; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास केंद्र सरकारकडून दिरंगाई होत आहे. मात्र, राज्य शासन मराठी भाषेची गळचेपी होऊ देणार नाही. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परिसरात येत्या दोन वर्षांमध्ये मराठी भाषा भवन उभारण्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात सोमवारी (दि. 28) झालेल्या पदाधिकारी बैठक व युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेते सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, विनायक पांडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मनपा नगरसेवक मुशीर सय्यद आदी उपस्थित होते. मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजन सोहळ्यात पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सेनेचा महापौर बसविण्याचे आवाहन ना. सामंत यांनी केले.
आहेत. या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यात सहा नवीन उपकेंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. प्राध्यापकांना विविध वेतन आयोग लागू होतील. मात्र, प्राध्यापकांनी विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून जबाबदारी पार पाडली पाहिजे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयातील गॅदरिंग झाले नाहीत. आगामी शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयस्तरावर तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये पदाधिकार्यांनी गटबाजीला बाजू ठेवून काम केल्यास शिवसेनेला कोणीही हरवू शकत नाही. पदाधिकार्यांनी आपापले बालेकिल्ले संभाळले पाहिजेत. शहरातील तिन्ही आमदार निवडून आणण्यासह महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा फडकविण्याची शपथ घ्यावी लागणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
विद्यापीठ परीक्षा ऑफलाइनच
विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत कोरोनामुळे दोन वर्षे ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर नियमित वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे ऑफलाइन मूल्यमापन होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.