

जळगाव पुढारी वृत्तसेवा : जळगाव शहरातील विविध परिसरांमधून आपल्या साथीदारांसह दुचाकी चोरणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहे. संशयितांकडून ५ दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहे. आरोपीच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असल्याने असे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला रूपेश संजय पाटील हा त्याच्या साथीदारांसह दुचाकी चोरीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक फौजदार अशोक महाजन, युनुस शेख, रमेश जाधव, पोलीस हवलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, संदीप साबळे, पोना राहुल पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, ईश्वर पाटील, प्रविण मांडोळे, उमेश गोसावी, हेमंत पाटील, दिपक शिंदे, मुबारक देशमुख यांनी सापळा रचून संशयित आरोपी रूपेश संजय पाटील रा. साखरे ता. धरणगाव याला अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. त्याला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहे.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.