निर्बंध शिथिल झाल्याने फॅशन व्यवसायाला पुन्हा ‘अच्छे दिन’

Fashon
Fashon
Published on
Updated on

सुवर्णा चव्हाण

पुणे : सध्या फॅशन व्यवसायाला अच्छे दिन आले आहेत. फॅशन शोपासून सौंदर्य स्पर्धांपर्यंत आणि ब्रँड प्रमोशनपासून फोटोशूटपर्यंतची कामे मोठ्या जोमाने सुरू झाली आहेत.

पुण्यात मोठ्या प्रमाणात संस्थांकडून सौंदर्य स्पर्धाही आयोजित केल्या जात असून, त्यातून फॅशन डिझायनरपासून ते नृत्यदिग्दर्शकांपर्यंत सगळ्यांना कामे मिळू लागली आहेत. यातून अनेक संस्थांना आर्थिक फायदाही होत आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे फॅशन व्यवसायाला उतरती कळा आली. हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. मागील वर्षी ऑक्टोबरनंतर फॅशन व्यवसाय थोडाफार स्थिरावला होता. पण, पुन्हा कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे राज्य सरकारने नियमावली लागू केली अन् फॅशन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. मात्र, निर्बंधांमध्ये शिथिलता आणल्यामुळे आता व्यवसायाची स्थिती सुधारली आहे.

नृत्यदिग्दर्शक सचिन गवळी म्हणाले, 'गेल्या काही वर्षांत पुण्यातील फॅशन व्यवसायाने मोठी मजल मारली आहे. अनेक फॅशन डिझायनरचे शहरात फॅशन बुटीक आहेत. पुण्यात अनेक फॅशन शो, सौंदर्य स्पर्धा, फॅशन इव्हेंट, कॉर्पोरेट इव्हेंट, ब—ँड प्रमोशन, फोटोशूट, कपड्यांचे प्रदर्शन आदी इव्हेंट आयोजित केले जात आहेत. त्यामुळे फॅशन शोसाठी काम करणारे मॉडेल्स, फॅशन डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, संगीत संयोजक, छायाचित्रकार, व्हिडीओग्राफर, फॅशन संस्था संचालक, नृत्यदिग्दर्शक या प्रत्येकाच्या कामाला गती मिळाली आहे. त्यांना काम मिळू लागले आहे.'

कोरोनामुळे फॅशन व्यवसायाला वाईट दिवस आले होते. निर्बंधांमध्ये फॅशन शो करायचा कसा, हा प्रश्न आमच्यासमोर होता. पण, आता कोरोनाच्या स्थितीतही काम करण्यास आम्ही शिकलो आहोत. त्यामुळेच फॅशन शो आणि इतर कार्यक्रमही घेत आहोत. महिन्याला किमान 12 ते 15 फॅशन इव्हेंट होत आहेत. सध्या सौंदर्य स्पर्धा, फोटोशूट, ब—ँड प्रमोशन असे वेगवेगळे कार्यक्रमही होत असून, ही चांगली गोष्ट आहे.

                                                                         – योगेश पवार, फॅशन शो संयोजक

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news