पुणे : इंदापूर तालुक्यात गट-गणांच्या फेररचनेविषयी उत्सुकता | पुढारी

पुणे : इंदापूर तालुक्यात गट-गणांच्या फेररचनेविषयी उत्सुकता

रियाज सय्यद

भवानीनगर : इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या गट आणि गणांमध्ये फेररचना करण्यात आली आहे. या नवीन गट व गणांविषयी इच्छुकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, संभाव्य अंदाज लक्षात घेत इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

हृदयद्रावक! विहिरीचा स्लॅब कोसळून ११ महिलांचा जागीच मृत्यू, हळदी समारंभावेळी घडली दुर्घटना

पूर्वी इंदापूर तालुक्यामध्ये ७ जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती गण होते. यामध्ये फेररचना करून २ जिल्हा परिषद गट व ४ पंचायत समिती गण वाढविण्यात आल्याची चर्चा सध्या इच्छुक उमेदवारांमध्ये आहे. त्यानुसार आता ९ जिल्हा परिषद व 18 पंचायत समिती गण निर्माण करण्यात आले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु, या गट-गणांच्या फेररचनेमध्ये कोणकोणत्या ग्रामपंचायती घेण्यात आल्या आहेत, हे जाहीर करण्यात आलेले नाही.

सोमय्यांनी अमित शहा, फडणवीसांच्या नावाखाली वसुली केली : संजय राऊत

लवकरच जिल्हा परिषद पंचायत समितीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांनी नेत्यांकडे आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद गट व गण जाहीर झाल्यानंतर गणातील व गटातील आरक्षण जाहीर होणार आहे. परंतु, गट, गण व आरक्षण जाहीर होण्यापूर्वी इच्छुकांनी मात्र फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. आपल्यासाठी पंचायत समिती गणातील व जिल्हा परिषद गटातील कोणकोणती गावे सोयीची आहेत, याबाबतची इच्छुकांमध्ये चर्चा सुरू आहे. सध्याच्या जिल्हा परिषद गटांना लगत असलेली जी गावे सोयीची आहेत ती गावे आपल्या जिल्हा परिषद गटात किंवा पंचायत समिती गणात येथील, अशी अपेक्षा इच्छुकांमधून व्यक्त होत आहे.

नाशिक : बापलेकाच्या खून प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे

विरोधकांच्या गट, गणातील मतदारांची इच्छुकांकडून चाचपणी

जुन्या जिल्हा परिषद गट किंवा पंचायत समिती गणाच्या लगत असलेली विरोधी पक्षाच्या ताब्यात असलेली एखादी ग्रामपंचायत आपल्या गटात किंवा गणात येण्याची शक्यता इच्छुकांना वाटत आहे. ती ग्रामपंचायत आपल्या गटात किंवा गणात येऊ नये व जर आलीच तर त्या गावांमध्ये आपल्या पक्षाला मानणारी व आपली ओळख असणारी किती घरे आहेत, याची चाचपणी इच्छुकांकडून सुरू आहे. नवीन जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण कशा पद्धतीने झाले असतील, असे अंदाज बांधले जात आहेत. इच्छुक उमेदवारांबरोबरच मतदारांमध्ये देखील आपण कोणत्या जिल्हा परिषद गटात किंवा कोणत्या पंचायत समिती गणात येऊ, याबाबत चर्चा सुरू आहे.

हेही वाचा

औरंगाबाद : स्फोट झालेल्या कारमधील जोडप्याच्या नग्न मृतदेहांचे गूढ कायम

नाशिक : गोदावरी नदीचे पाणी पिण्यासाठीच नव्हे, आंघोळीकरिताही अयोग्य

रोहित शर्मा कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड निश्चित

Back to top button