जळगाव : पुढारी वृत्तसेवा : चाळीसगाव आनंदवाडी येथील 4 वर्षीय मुलीस खाऊच्या बहाण्याने रेल्वे पटरीच्या बाजूला जाऊन लैंगिक अत्याचारप्रकरणी विशेष न्यायालयाने जलदगतीने शिक्षा सुनावली आहे.
आनंदवाडी येथे झालेल्या अत्याचारप्रकरणी आरोपी सावळाराम शिंदे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावत त्याला तीन लाखाचा दंड व दंडातील पन्नास टक्के रक्कम पीडितेला देण्याचे न्यायालयाने आदेशित केले आहे. तसेच पुनर्वसनासाठी दहा लाख रुपये देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहे. चाळीसगाव पोलिसांनी आरोपी संदर्भातील सॅम्पल तत्काळ प्रयोगशाळेत पाठवून डी.एन.ए.अहवाल प्राप्त करून अवघ्या 17 दिवसात तपास पूर्ण केला. एस.एन.माने – गाडेकर यांच्या विशेष न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते.
न्यायालयाने जलद गतीने खटल्याची सुनावणी करत आरोपीस बुधवारी (दि.16) विविध कलमानुसार आजन्म कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदरच्या गुन्हयाच्या तपासात पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलिस अधिक्षक चाळीसगाव रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी कैलास गावडे यांनी कामकाज पाहीले. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पोलिस कॉन्स्टेबल दीलीप सत्रे यांनी मदत केली. तर जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.