नाशिकमध्ये बापलेकाचा खून ; मारेकऱ्याने मृतदेह जाळून फेकले दरीत | पुढारी

नाशिकमध्ये बापलेकाचा खून ; मारेकऱ्याने मृतदेह जाळून फेकले दरीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील पंडित कॉलनी परिसरात राहणाऱ्या व गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या पिता पुत्राचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. मारेकऱ्याने त्यांचे मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने दरीत फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. सुरुवातीला दोघेही बेपत्ता असल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्याचे समजते.

सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नानासाहेब रावजी कापडणीस (७०) व अमित नानासाहेब कापडणीस (३५) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. मारेकऱ्याने दोघांचे खून करून त्यांचे मृतदेह आंबोली घाटाच्या पुढे जव्हार मार्गावर मृतदेह जाळले. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दरीत फेकून दिले. याप्रकरणी मारेकऱ्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी यतीन मोहन पाटील (३६, गंगापुर रोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. संशयित राहुल गौतम जगताप (३६, रा. लहवीत, सध्या रा. पंडित कॉलनी) याने १५ ते ३० डिसेंबर २०२१ दरम्यान हे खून केले. सुरुवातीला नानासाहेब कापडणीस याना जुना गंगापूर नाका येथे बोलवून खून केला, त्यानंतर अमित कापडणीस यांचा गळा आवळून खून केल्याचे समोर येत आहे. पैशांचा हव्यास व मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने संशयिताने हे खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा ;

Back to top button