संजय राऊत म्हणाले, “बाप बेटे जेलमध्ये जाणार! वेट अ‍ॅंड वाॅच!”

खासदार संजय राऊत
खासदार संजय राऊत
Published on
Updated on

मुंबई, पुढारी ऑनलाईन : "भाजपचे साडेतीन नेते जेलमध्ये जाणार", असं वक्तव्य करून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक खुलासे केले. आणखी काही खुलासे येत्या काही दिवसांत होतील, असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी आज सकाळी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून संकेतात्मक ट्विट केलं आहे. ते म्हणाले आहेत की, "बाप बेटे जेलमध्ये जाणार! वेट अ‍ॅंड वाॅच! कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू आहे…", त्यांच्या या ट्विटमुळे चर्चेला पुन्हा सुरूवात झाली आहे.

संजय राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

    • शिवसेना पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे, राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्‍यासह महाविकास आघाडीचे सर्व नेत्‍यांचे आम्‍हाला आर्शीवाद आहेत. मन स्‍वच्‍छ असेल तर कोणालाही घाबरण्‍याची गरज नाही. केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्‍या काही नेत्‍यांवर जाणीवपूर्वक कारवाई केली जात आहे. हे महाराष्‍ट्रावरील संकट आहे. तसेच पश्‍चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्‍या नेत्‍यांवर कारवाई सुरु आहे.
    • भाजपचे प्रमुख नेते मला भेटले. त्‍यांनी मला हे सांगण्‍याचा प्रयत्‍न केला की, तुम्‍ही या सरकारमधून बाहेर पडा. आम्‍हाला हे सरकार घालवायचे आहे. काही आमदार आमच्‍या हाताशी लागत आहेत. तुम्‍ही आमचे सरकार येण्‍यासाठी मदत करा. तुम्‍ही मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्‍हाला टाईट करतील, अशी धमकी मला दिला. तुम्‍हाला पश्‍चाताप होईल, अशी धमकी भाजप नेत्‍यांनी मला दिली.
  • मदत केली नाही तर राज्‍यात राष्‍ट्रपती राजवट लागू करु, अशी धमकी भाजपच्‍या नेत्‍यांनी मला दिली. मराठी भाषेला विरोध करणारे किरीट सोमय्‍या हे भाजपचे फ्रंटमॅन आहे. ते शिवसेनेच्‍या नेत्‍यांवर खोटे आरोप करीत आहेत. गुजरातमध्‍ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला. गेली दोन वर्ष हा घोटाळा सुरु होता तेथे कारवाई का केली नाही.
  • फडणवीसांच्‍या काळात महाआयटीमध्‍ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला. देवेंद्र फडणवीस यांच्‍या काळातील महाराष्‍ट्रात सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांचा भागीदार हा किरीट सोमय्‍या यांचा मुलगा आहे. राकेश वाधवान याचा भाजपशी थेट आर्थिक संबंध आहे.
  • किरीट सोमय्यांचा मुलगा पीएमसी घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानचा पार्टनर आहे. निकॉन इन्फास्ट्रक्चर कंपनी किरीट सोमय्यांची मुलाची आहे. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना तातडीने अटक करा. किरीट सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराच्या कागदपत्रे तीन वेळा मी ईडी कार्यालयात पाठविली आहेत. भाजपचे लोक ईडीचे वसुली एजंट बनलेत.
  • दोन वर्षांपूर्वी भाजप नेत्‍यांच्‍या मुलीचे लग्‍न झाले. त्‍याला जंगलाचा सेट लावण्‍यात आला. आम्‍ही विचार केला, कोणाचाही शिरायचे घरात  नाही. हे आमच्‍या मुलांवर आमच्‍या मुलींच्‍या लग्‍नाचा हिशोब विचारतात. माझ्‍या मुलीच्‍या लग्‍नात लावलेल्‍या नेलपाॅलीशचा खर्च तपास करते, माझ्‍या टेलरकडे ईडीने जावून मी किती कपडे शिवले याची माहिती घेते, हे ईडीचे काम आहे, असा सवालही त्‍यांनी केला.
  • मला जेलमध्ये टाका. पण माझ्या कुटुंबियांना, नातेवाईकांची सतावणूक कशासाठी? असा सवाल त्यांनी केला. हा ट्रेलर आहे यापुढे मी व्हिडिओ, क्लिप्स घेऊन येणार आहे.

हे वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news