नाशिक : बालपरिषदेतून तंबाखू मुक्तीचा ध्यास ; ना. भुजबळांनीही केले मार्गदर्शन | पुढारी

नाशिक : बालपरिषदेतून तंबाखू मुक्तीचा ध्यास ; ना. भुजबळांनीही केले मार्गदर्शन

नाशिक पुढारी वृ्तसेवा : सलाम मुंबई फाऊंडेशन आणि एव्हरेस्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने (दि. १०)  नाशिक येथे आंतरराज्य स्तरीय द्वितीय बालपरिषद पार पडली. शालेय आणि गाव स्तरावर मुलांनी केलेल्या वेगवेगळ्या कृती कार्यक्रमांना प्रोत्साहन मिळावे, त्यांनी केलेल्या कार्यास एक व्यासपीठ मिळावे आणि मुलांचा तंबाखू मुक्तीचा आवाज बुलंद व्हावा या हेतूने  ऑनलाइन द्वितीय बालपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या बालपरिषदेचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी या कार्यक्रमास गणेश परळीकर (सहाय्यक आयुक्त, नाशिक एफडीएफ विभाग), पृथ्वीपाल सिंग (शिक्षणाधिकारी, कटनी जिल्हा (मध्यप्रदेश), योगेश पाटील (समाज कल्याण अधिकारी, नाशिक) , धर्मराज बांगर (सहाय्यक पोलीस निरीक्षक, नाशिक) पोलीस विभाग,  सरोज जगताप (गटशिक्षणाधिकारी, पेठ तालुका , नाशिक),  डॉ. शिल्पा बांगर (जिल्हा एनटीसीपी सल्लागार, नाशिक) आरोग्य विभाग, ए. के कोरी गटशिक्षणाधिकारी विजयराघवगड (मध्यप्रदेश) शिक्षण विभाग, राजेंद्र जाधव (वार्ताहर), राजेश्री कदम विस्वस्थ, सलाम मुंबई फाऊंडेशन,  विजेंद्र बाबू
प्लांट हेड, एव्हरेस्ट इंडस्ट्रीज, लखमापूर दिंडोर, नाशिक,  सुलक्षा शेट्टी CHRO एव्हरेस्ट इंडस्ट्रीज
मुंबई, शुभश्री सरकार सीएसआर हेड, एव्हरेस्ट इंडस्ट्रीज, मुंबई आदी उपस्थित होते.

बालपरिषदेच्या माध्यमातून नाशिक मधील सर्व शाळांनी शिक्षण विभागाने पारित केलेल्या ०९ निकषांची पूर्तता करावी हा संदेश बालपरिषदेच्या माध्यमातून देण्यात आला. तसेच नाशिक मधील सर्व शाळा मार्च २०२२ पर्यंत तंबाखूमुक्त व्हाव्यात असे आवाहन करण्यात आले. शालेय आणि गावस्तरावर कार्य करीत असताना विद्यार्थ्यांना काही समस्या आलेल्या आहेत, काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि चांगले अनुभव देखील आलेले आहेत. या अनुभवांची देवाण घेवाण व्हाव्ही त्यांना निंर्माण झालेल्या प्रश्नांची उकल व्हावी हा देखील एक उद्देश बालपरिषदेचा होता.

या बालपरिषदेला नाशिक आणि मध्यप्रदेश मधून एकूण 350 विद्यार्थी आणि 110 शिक्षक, अधिकारी यांनी सहभाग नोंदवला. या बालपरिषदे मध्ये सहभागी मुला-मुलींनी शासकीय अधिकारी यांना नाशिक आणि मध्यप्रदेश मधील शाळा तंबाखुमुक्त होण्यासाठी प्रश्न विचारले. तर सर्व अधिकारी वर्गाने देखील मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. लवकरच नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त होतील असे सांगितले गेले.

नाशिक जिल्ह्यातील यंग प्रतिनिधींनी एकत्र येऊन नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी बालपरिषद हे व्यासपीठ तयार केले आहे. ज्या बालपरिषदेच्या माध्यमातून मुले तंबाखूमुक्त शाळा अभियान सक्षम करण्यासाठी एकत्र आली होती.

हेही वाचा :

Back to top button