जळगाव : पाच बंद घरे फोडून चोरट्यांनी लुटला लाखोंचा मुद्देमाल | पुढारी

जळगाव : पाच बंद घरे फोडून चोरट्यांनी लुटला लाखोंचा मुद्देमाल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : पारोळा येथे अज्ञात चोरट्यांनी पाच बंद घरे फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्‍यांसह रोकड असा एकूण २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरला. यासंदर्भात पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणाल रंगराव पाटील (२२, रा. भिलाली ता. पारोळा) यांच्या घरात बुधवारी (दि. ९) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली. हा प्रकार गुरुवार (दि. १०) सकाळी ६ च्या सुमारास उघडकीला आला. याबाबत चौकशी केली असता, गावातीलच विशाल सूर्यकांत पाटील, लोटन तुळशीराम पाटील, रवींद्र साहेबराव पाटील, संत सोनगीर महाराज मंदिराची दानपेटी आणि शंकर बडगू पाटील (सर्व रा. भिलाली, ता. पारोळा) यांच्याकडेही त्याच दिवशी चोरी झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला. त्यात चोरट्यांनी एकूण सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी कुणाल पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागूल अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button