पुणे : वडगाव शेरीत आजी-माजी आमदारांचे कसब पणाला

पुणे : वडगाव शेरीत आजी-माजी आमदारांचे कसब पणाला
Published on
Updated on

माउली शिंदे

वडगाव शेरी : भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा हा बालेकिल्ला आहे. त्यांना प्रभागातील भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणून बालेकिल्ला राखायचा आहे. तर, राष्ट्रवादीला भाजपच्या बालेकिल्ल्यावर झेंडा फडकवायचा आहे. यामुळे या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या प्रभागात उमेदवार पळवापळवी होण्याची शक्यता आहे.

Ward 6
Ward 6

या मतदारसंघामध्ये आजी-माजी आमदारांचे कसब पणाला लागले आहे. वडगाव शेरी प्रभागात चार नगरसेवक होते. नव्या प्रभागरचनेमध्ये वडगाव शेरीचा बराचसा भाग हा कल्याणीनगर नागपूर चाळ प्रभागाला जोडला गेला आहे. यामुळे चारपैकी एक नगरसेवक कल्याणीनगरमधून रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.

मतदारसंघाचे दोन तुकडे

प्रारूप प्रभाग रचनेनुसार वडगाव शेरी मतदारसंघाचे दोन तुकडे केले. कल्याणीनगर आणि नवरत्न सोसायटी हा 30 टक्के परिसर नव्याने होणार्‍या प्रभाग 7 नागपूर चाळ कल्याणीनगरला जोडला आहे. तसेच, विमाननगर तीनचा काही भाग नगरसेविका श्वेता खोसे गलांडे यांच्या घराजवळचा परिसर वडगाव शेरी प्रभागाला जोडला आहे. नव्याने होणार्‍या वडगाव शेरी प्रभाग सहामध्ये दोन ते तीन वेळा नगरसेवकपद उपभोगलेले उमेदवार भाजपकडे आहेत. राष्ट्रवादीला पॅनेल मजबूत करण्यापासून बंडखोरी रोखण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

प्रभागरचनेमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला गणेशनगर भाग खराडी-चंदननगर या प्रभागामध्ये जोडला गेला आहे.
शिवसेनेतील अनेक इच्छुकांची वडगाव शेरी प्रभागाला पंसती आहे. महाविकास आघाडीमधील शिवसेनेला वडगाव शेरीत जागा न दिल्यास वेगळी चूल मांडण्याचा विचार कार्यकर्ते मांडत आहेत. वडगाव शेरीमधील महाविकास आघाडीची फूट ही भाजपसाठी फायद्याची ठरणार आहे.

या प्रभागात इच्छुकांची संख्यासुद्धा अधिक आहे. सगळ्याच पक्षांमध्ये इच्छुक आहेत. काँग्रेस- रवींद्र उकरंडे, प्रमोद देवकर, राजेश देवकर, करीम शेख, माजी नगरसेवक कै. रवींद्र गलांडेंचे चिरंजीव महेश रवींद्र गलांडे, साजिद शेख, अभिजित साळवी, अ‍ॅड. साधना संदेश गलांडे, अश्विनी रवींद्र उकरंडे, रूपाली महेश गलांडे. भाजप- नगरसेवक योगेश मुळीक, संदीप जर्‍हाड, नगरसेविका सुनीता गलांडे, शीतल शिंदे, विजय गलांडे, शिवसेना- माजी नगरसेवक सचिन भगत, नितीन भुजबळ, शिवाजी वडघुले, अशोक राऊत, अ‍ॅड. सतीश मुळीक, साधना भगत, मनीषा देवकर. राष्ट्रवादी- नारायण गलांडे, आशिष माने, नीता गलांडे, अनिल गलांडे, अपक्षांमध्ये शिल्पा संजय गलांडे.

अशी आहे प्रभागरचना

साईनाथनगर, मारुतीनगर, दिगंबरनगर, रामवाडी, सोपाननगर, इन ऑर्बिट मॉल, वडगाव शेरी गावठाण, आनंद पार्क, साईनाथनगर, गणेशनगर लेन नं. 13, पुण्यनगरी, पुण्य धाम, टेम्पो चौक, सैनिकवाडी, प्रसादनगर, वडगाव शेरी भाजी मंडई, गुरुद्वारा, वडगाव शेरी सर्व्हे नं. 56, 57.

  • एकूण लोकसंख्या – 60110
  • अनुसूचित जाती (एससी) -6588

https://youtu.be/gfZJcopVz0g

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news