नाशिकमध्ये खासगी ट्रॅव्हल्स वनविभागाच्या रडारवर ; सागरी व वन्यजीव तस्करी प्रकरण | पुढारी

नाशिकमध्ये खासगी ट्रॅव्हल्स वनविभागाच्या रडारवर ; सागरी व वन्यजीव तस्करी प्रकरण

नाशिक : नितीन रणशूर
सागरी तसेच इतर वन्यजीव तस्करीचे मुख्य धागेदोरे नाशिकमध्ये आढळून आल्यानंतर स्थानिक वनविभाग सतर्क झाला आहे. वन्यजीव तस्करीची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे. मंगळवारी (दि.8) दिवसभर वनविभागाच्या चौकशीत इतर शहरांतून वन्यजीवांचे अवयव विक्रीसाठी नाशिकमध्ये आणले जात असल्याचे समोर आले. त्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सचा वापर केला जात असल्याने त्या वनविभागाच्या रडारवर आल्या आहेत.

वन गुन्हेगारीचे नाशिक कनेक्शन सातत्याने समोर येत आहे. गेल्या आठवड्यात शहापूर वनविभागाने सिन्नर-इगतपुरी मार्गावरील कारवाईत बिबट्याची कातडी जप्त केली. तर कोल्हापूर वनविभागाने नाशिकमध्ये छापेमारी करत सागरी व इतर वन्यजीवांचे अवयव हस्तगत केले. स्थानिक वनविभागानेही तस्करीचा प्रकार गांभीर्याने घेत कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. द्वारका परिसरातील पेट शॉपचालकांवरील छापेमारीनंतर कामटवाडे परिसरातूनही संशयिताला ताब्यात घेतले. वन्यजीव तस्करी प्रकरणाच्या संशयितांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. खासगी ट्रॅव्हल्सचालकांचा तस्करीत सहभाग असल्याचे समजते. त्या अनुषंगाने वनविभागाने चौकशीचा मोर्चा वळविला आहे.

दोन खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या चालकांना चौकशीसाठी बोलविण्यात आले असून, संशयितांकडून ओळख परेड केल्यानंतर संबंधितांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत. संशयित ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्या जप्त करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, संशयित वसीम चिरागोद्दीन शेख (38), फारूख चिरागोद्दीन शेख (34) यांना 10 तारखेपर्यंत तर भरत देवरेला 14 फेब—ुवारीपर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे. संशयितांच्या चौकशीत आणखीन 10 जणांची नावे समोर आली असून, त्यांच्यावर वनविभागाची नजर आहे. इतरांना चौकशीनंतर ताब्यात घेतले जाणार असल्याचे समजते.

Weather Updates : दिल्‍लीत पाऊस, आज, उद्‍या ‘या’ राज्‍यांमध्‍ये पावसाची शक्‍यता

येथून होते तस्करी
वनतस्करांचे खंडवा, मुंबई, हैदराबाद व बंगळुरू आदी परिसरातील स्थानिक टोळीसोबत नेटवर्क आहे. या ठिकाणांहूनच सागरी व इतर वन्यप्राण्यांचे अवयव विक्रीसाठी नाशिकमध्ये येत असतात. वनतस्करीत मालेगावचेही नाव जोडले जात आहे.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button