Weather Updates : दिल्‍लीत पाऊस, आज, उद्‍या ‘या’ राज्‍यांमध्‍ये पावसाची शक्‍यता | पुढारी

Weather Updates : दिल्‍लीत पाऊस, आज, उद्‍या 'या' राज्‍यांमध्‍ये पावसाची शक्‍यता

पुढारी ऑनलाईन : नवी दिल्‍ली
देशातील काही राज्‍यांमध्‍ये आज आणि उद्‍या पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने ( Weather Updates ) व्‍यक्‍त केला आहे. दरम्‍यान, दिल्‍ली-एनसीआरमध्‍ये आज सकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे तापमानात घट झाली आहे. दिल्‍लीत आज किमान तापमान १३ तर कमाल २२ डिग्री सेल्‍यियस राहणार असल्‍याचेही हवामान विभागाने म्‍हटलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्‍या माहितीनुसार, आज ( दि. ९) पंजाब, हरियाणा, दिल्‍ली, उत्तर प्रदेश आणि राजस्‍थानमधील उत्तर भागात विजेच्‍या कडकाटासह पाऊस पडेल. तसेच पश्‍चिम हिमालय क्षेत्र जम्‍मू, काश्‍मीर, लडाख, मुजफ्‍फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उतराखंडमध्‍ये हलका पाऊस पडेल तसेच हिमवृष्‍टी होण्‍याचीही शक्‍यता आहे.

आज आणि उद्‍या या दोन दिवसांमध्‍ये पश्‍चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, दिल्‍ली, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिजोराम आणि त्रिपुरामधील काही भागात रात्री व सकाळी दाट धुके पडण्‍याचीही शक्‍यता आहे. तसेच पश्‍चिम बंगाल, सिक्‍किम आणि झ्रारखंडमध्‍ये पाऊस पडेल. त्‍याचबराेबर बिहार आणि ओडिशा राज्‍यातील वेगवेगळ्या जिल्‍ह्यांमध्‍ये पावासामुळे तापमानात घट होण्‍याची शक्‍यता आहे.

Weather Updates : दिल्‍लीत हवामानाचा ‘मूड’ बदलला

आज सकाळी दिल्‍लीतील काही भागात पावसाच्‍या हलक्‍या सरी कोसळल्‍या. यामुळे तापमानात घट झाली आहे. दिल्‍लीत आज दिवसभरात विजेच्‍या कडकडाटासह पाऊस कोसळले, असा अंदाज हवामान विभागाने व्‍यक्‍त केला आहे. दिल्‍ली-एनसीआरसह हरियाणामधील सोनीपत, गुरुग्राम, हिसार व परिसरात मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस पडेल. ताशी २० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्‍याचीही शक्‍यता व्‍यक्‍त करण्‍यात आली आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button