जळगाव : जिल्ह्यात ३४ वाळू घाटांचे होणार लिलाव

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
Published on
Updated on

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : जिल्ह्यात गिरणा, तापी, वाघुरसह अन्य नदी नाले ओढे आदी ठिकाणच्या सुमारे १४५ च्या वर वाळू घाट आहेत, यापैकी ३४ ठिकाणच्या वाळू घाटांच्या लिलावास मान्यता देण्याची प्रक्रिया अंतिम टप्य्यात असून  लिलाव प्रक्रियेची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात तापी, गिरणा, वाघुर आदी नदी नाले, ओढ्यातील वाळू साठा  उचलण्यासाठी यावर्षी देखील प्रदूषण नियंत्रण मंडळ सर्वेक्षण अहवालानुसार गेल्या वर्षी २१ वाळूघाटांचे लिलाव झाले होते त्यापैकी ८ घाटांसाठीच निविदाकारानी अनामत रकमेचा भरणा केला. त्यामानाने अनेक वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध वाळू उचल झाली आहे, पर्यावरणाचा ह्रास रोखण्यासह वाळू घाटांच्या लिलावातु शासनाला महसूल मिळावा यासाठी जिल्ह्यात ३४ वाळूघाटांचे लिलाव प्रस्तावित आहेत. या वाळू घाटांची  प्रशासकीय धोरणानुसार ६कोटी ३८ लाख ५१ हजार ३७३ निश्चित करण्यात आली आहे. तर  १०९०८२ ब्रास  वाळू उत्खननासाठी  प्रस्तावित आहे.

जोगलखेडे, बेल्व्हाय १,२, ता. भुसावळ, पिंप्री, सुटकार ता.चोपडा, थोरगव्हाण, पिंप्री, शिरागड, पथराळे ता. यावल, भोकरी, पातोंडी, पिंप्रीनांदू ता.मुक्ताईनगर, रुंधाटी२, हिंगोणे सिम, धावडे, तांदळी, जळोद, ता.अमळनेर, वडगाव, आंदळवाडी, केऱ्हाळे खु, धुरखेडा, पातोंडी,दोधे ता.रावेर, बाभुळगाव १, २ ता.धरणगाव, भोकर, पळसोद ता.जळगाव, उत्राण प्र.ह, १,२१ हनुमंतखेडा सिम १,२ ता. एरंडोल असे ३४ वाळू घाट प्रस्तावित असून यांची लिलाव प्रक्रिया अंमलबजावणी केली जाणार असल्याचे जिल्हा गौण खनीकर्म अधिकारी दिपक चव्हाण यांनी म्हटले आहे.

हे ही वाचलं का  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news