कोल्‍हापूर : कडाक्याच्या थंडीत खासबाग मैदानाची स्वच्छता | पुढारी

कोल्‍हापूर : कडाक्याच्या थंडीत खासबाग मैदानाची स्वच्छता

कोल्‍हापूर, पुढारी वृत्‍तसेवा :  राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षाची सुरुवात जनसंघर्ष सेनेकडून खासबाग कुस्ती मैदानाच्या स्वच्छतेने करण्यात आली. स्वच्छता मोहिमेला कडाक्याच्या थंडीतसुद्धा युवकांची उपस्थिती लक्षणीय स्वरूपाची होती. यावेळी स्मृतिशताब्दी लोगोचे अनावरण करण्यात आले. अनेक उपक्रमांनी विचारोत्सव म्हणून हे वर्ष साजरा करण्याचा निर्णय मोहिमेनंतर आयोजित बैठकीत घेण्यात आला.

अत्याधुनिक मशीनद्वारे खासबाग कुस्ती मैदानाची स्वच्छता मोहीम घेण्यात आली. राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेले हे भारतातील पहिले कुस्ती मैदान आहे. यावेळी जवळपास 200 युवकांनी उपक्रमात सहभाग घेतला.
यावेळी जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी म्हणाले, स्मृतिशताब्दी वर्षानिमित्ताने लोकराजा शाहू महाराजांच्या स्मृती जपण्यासाठी कार्यरत राहणे, गरजेचे आहे. छत्रपती शाहू मिल्स, मुंबईतील ‘पन्हाळा लॉज’ या महाराजांच्या निधनस्थळी भव्य स्मारक, समाधीस्थळावरील वस्तुसंग्रह, जन्मस्थळ विकास यासह वारसा लाभलेल्या वास्तूंचे जतन करण्यासाठी जनसंघर्ष सेना प्रयत्नशील आहे. दर रविवारी एका ऐतिहासिक ठिकाणाची स्वच्छता मोहीम होणार आहे.

जनसंघर्ष सेनेकडून स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त अनेक उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. सर्व महाविद्यालयात शाहू चरित्रपर व्याख्यान, राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धा, महिलांसाठी स्पर्धा तसेच ग्रंथदिंडी व तीनदिवसीय ‘राजर्षी शाहू महोत्सव’ आयोजित करून शाहूविचारांचा जागर करण्यात येणार आहे. यावेळी गणेशकुमार खोडके, राम यादव, बाबा महाडिक, अशोक पोवार, दीपक पोलादे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी विश्वजीत पाटील, संदेश पोलादे, सुनील थोरवत, सुनील राठोड, राकेश देसाई, स्वरूप जगदाळे, ओम शिंदे, सुशांत माने, राजनीश चौगले, संग्राम जाधव, मखदूम नाईकवडी, चंदा बेलेकर, प्रवीण पडवळे, सत्यम हिंदुळे तसेच महापालिकेचे सफाई, बगीचा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

हे ही वाचलं का 

Back to top button