मोशीतील इंद्रायणीवरील जुना पूल दुर्लक्षित | पुढारी

मोशीतील इंद्रायणीवरील जुना पूल दुर्लक्षित

संवर्धन करून जॉगिंग ट्रॅक, सनसेट पॉइंट, विरंगुळा केंद्र उभारण्याची मागणी

मोशी : श्रीकांत बोरावके : ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या मोशी येथील इंद्रायणी नदीवरील जुन्या पुलावरून वाहतूक बंद आहे. त्यामुळे सध्या हा पूल दुर्लक्षित आहे.

महापालिकेने त्याचे संवर्धन केल्यास या ठिकाणी परिसरातील नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारले जाऊ शकेल; तसेच ब्रिटिशकालीन ठेवा जतन होईल, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

येथील जुन्या पुलाचा शंभरवर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्याच पुलालगत नवीन पूल उभारण्यात आला. त्यानंतर या जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली.

डिसले गुरुजींना रजा का दिली? जि. प. सदस्याचा सवाल

पुणे – नाशिक महामार्गावर टोल वसुली सुरू झाल्यानंतर टोल चुकवेगिरी होऊ नये म्हणून जुन्या पुलाकडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले.

तेव्हापासून हा पूल दुर्लक्षित झाला आहे; मात्र या दुर्लक्षितपणाचा गैरफायदा तळीराम आणि गर्दुल्ले घेत आहेत.रात्रीच्या वेळी इथे अंधार असल्याने मद्यपी पुलावरच दारू पिण्यास बसतात.

या पुलावरून इंद्रायणी नदीचे विलोभनीय चित्र दिसते. सायंकाळच्या वेळी पुलावरून सूर्यास्त पाहण्याचा क्षण एक निवांतपणाची अनुभूती देतो.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी खडसेंचा पाहुणचार

नदीपात्रात पडलेला सूर्यप्रकाश पात्रावर आपली केसरी छटा टाकून आपले मन मोहवून घेतो. पश्चिमेला वळण घेत मोशीत दाखल होणारी इंद्रायणी हे खरं तर शब्दात व्यक्त न होण्यासारखे चित्र येथे नजरेस येते.

येथे शेजारीच असलेला दशक्रिया विधी घाट विकसित करण्यात आला आहे. मात्र तेथे फिरण्यास येण्यासारखे वातावरण नसल्याने आणि त्यात काहीना काही विधी होत असल्याने नदीपात्रावर सफर मारायला हक्काची जागाच नागरिकांना उपलब्ध नसल्याचे दिसून येते.नदी ही मोशी गावचे वैभव आहे.

त्या ठिकाणी काही क्षणांचा विरंगुळा आणि निवांतपणे बसण्यासाठी जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे. यादृष्टीने पालिका प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे.

U19 World Cup : फायनलमध्ये इंग्लंडविरूद्ध भारताचे पारडे जड!

त्यामुळे मोशीचा जुना पूल विरंगुळा केंद्राच्या दृष्टीकोनातून संरक्षित आणि विकसित करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. पुणे शहरातील मुठा नदीवरील काही पुलांवर कलाकार कट्टा,निवांत बसण्यासाठी जागा उपलब्ध आहेत तशी जागा येथील पुलावर असावी अशी मागणी नागरिक व्यक्त करत आहेत.

येथील पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे देखील चोरांनी तोडून नेले असून जुना पुला दुर्लक्षित झाला आहे.एकंदरीत जुना म्हणून अडगळीला राहिलेला या पुलाचे संवर्धन तसेच सुशोभीकरण केल्यास केल्यास ब्रिटीश कालीन ठेवा जतन होणार आहे.

या ठिकाणी बसविण्यासाठी जागा, लाईट शो, जॉगिंग ट्रॅक उभारल्यास नागरिकांना नदी किनारी फिरण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होऊ शकेल. त्यातून शहराचे तसेच नदीकाठचे सौंदर्य देखील नजरेत भरेल.

जनावरांच्या गोठ्यात भरते शाळा, डिसले गुरुजींनी पुरस्कारासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप

…तर परिसराच्या सौंदर्यात भर

पुलाचे सुरक्षा ऑटिड केल्यास त्याच्या मजबुतीबाबत योग्य माहिती मिळू शकेल. त्यानंतर या पुलावर विकासकामे करता येतील; मात्र सर्व काही योग्य पद्धतीने पार पडल्यास मोशीतील या जुन्या पुलाच्या संवर्धनाचे एक विशेष मॉडेल म्हणून समोर येऊ शकते; तसेच परिसराच्या सौंदर्यात भर पडू शकेल.

 

Back to top button