धुळे पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यातील नंदाभवानी मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी 4 कोटी 90 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. या निधीतून लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या नंदाभवानी मंदिर परिसराचा आता तिर्थक्षेत्र म्हणून कायापालट होणार आहे. या कामासाठी निधी मिळावा म्हणून आ. कुणाल पाटील यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.
धुळे तालुक्यातील रावेर शिवारातील वनक्षेत्रात असलेले नंदाभवानी हे जागृत देवस्थान असून धुळे जिल्हयासह खान्देशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. वनक्षेत्रात असल्यामुळे तिर्थक्षेत्राबरोबर पर्यटनस्थळ म्हणून नंदाभवानी देवस्थान परिसराचा विकास व्हावा म्हणून आ. कुणाल पाटील यांनी राज्याच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन वेळोवेळी आवाज उठविला आहे.
या कामांचा समावेश-
नंदाभावनी परिसर विकासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीतून मुख्य प्रवेशव्दार, भक्तनिवास, प्रसादालय, सभामंडप, बगीचा व परिसर सुशोभिकरण, लहान मुलांसाठी खेळण्याची साधने, विद्युतीकरण, पाणी पुरवठ्याची सोय, वाहनतळ, शौच्छालय आदी कामे करुन भाविकांची सोयी सुविधा व विकास केला जाणार असल्याचे आ. कुणाल पाटील यांनी सांगितले आहे.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.