माझी तुझी रेशीमगाठ : नेहा नोकरी सोडून जाणार का?

माझी तुझी रेशीमगाठ : नेहा नोकरी सोडून जाणार का?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' आणि 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या दोन मालिकांचे महाएपिसोड येत्या रविवारी म्हणजेच ६ फेब्रुवारीला प्रसारित केले जाणार आहेत. दोन्ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचल्या आहेत आणि मालिकेत आता पुढे काय घडणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचला आहे. (नेहा )

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत यशच्या अपघातानंतर नेहा यशला भेटण्यासाठी त्याच्या घरी जाते. पण सिम्मी काकू तिला तिच्या गरीबीवरुन सुनावते आणि यशपासून लांब राहण्यास सांगते. दुखावलेली नेहा यशला शंभर रुपयात दिवस काढायचं चॅलेंज देते. नेहाला जाणीव होते की, कदाचित यशच्या बाबतीत आपण अतिरेक केला. पण घडलेल्या घटनांमुळे यश निर्णय घेतो की यापुढे नेहाला जबरदस्ती प्रेमाचा स्वीकार करायला लावायचा नाही.

याच दरम्यान मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी आलेल्या नेहाच्या हातात यशने रिलिविंग लेटर देऊन सांगतो की पुढच्या चार दिवसांत ती नोकरी सोडून जाऊ शकते. यश नेहाच्या नात्यातलं हे रंजक वळण या महाएपिसोडमध्ये चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. यानंतर काय असेल नेहाचा निर्णय हे येत्या आठवड्याच्या पुढच्या भागात चाहत्यांना पाहायल मिळणार आहे.

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेत सध्या अदिती आणि सिद्धार्थच्या संसाराच्या गाडीला सिद्धार्थच्या अमेरिकेच्या हट्टाने धक्का बसलाय. गोड गुलाबी संसाराच्या स्वप्नांमध्ये रमलेल्या अदितीला सिद्धार्थ खोटेपणाचा आधार घेऊन अमेरिकेला घेऊन जाण्याची स्वप्न रंगवतोय.

एकीकडे अदिती हनीमूनला जाण्याची तयारी करतेय तर सिद्धू अमेरिकेल्या जाण्याची तयारीच आहे. रविवारच्या विशेष भागात सिद्धार्थचा खोटेपणा अदितीसमोर येणार आहे. सिद्धार्थच्या खोटेपणाने दुखावलेली अदिती सिद्धार्थसोबत अमेरिकेला जाणार की कुटुंबाची साथ देणार? अदिती समोरचा हा पेच तिला कुठे घेऊन जाणार हे पाहाणं निश्चितच रंजक ठरणार आहे. यामुळे ही मालिका रंजक वळणावर येवून ठेपली आहे.

त्यामुळे या मालिकांमध्ये पुढे काय होणार? यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रविवार ६ फेब्रुवारी रोजीच्या १ तासांचे विशेष भागात 'माझी तुझी रेशीमगाठ' आणि 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' यापुढील घटना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news