प्रेयसीची आत्महत्या; प्रियकरानेही त्याच ओढणीने घेतला गळफास | पुढारी

प्रेयसीची आत्महत्या; प्रियकरानेही त्याच ओढणीने घेतला गळफास

केज; पुढारी वृत्तसेवा :

केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी येथे प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, हनुमंत पिंपरी येथील आकाश शिवाजी धेंडे यांच्या सोबत कोल्हापूर जिल्ह्यातील सावित्री नावाची एक २८ वर्षीय विवाहित महिला पळून आली होती. ते दोघे हनुमंत पिंपरी येथील बरड वस्तीवर येथे रहात होते.

दि. २० जुलै रोजी आकाश हा बाहेर गेला असताना सावित्री हिने गळ्यातील ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. रात्री आकाश घरी आल्यानंतर त्याने ही घटना पहिली आणि तात्काळ त्याने तिचा गळफास सोडवून तिला खाली उतरले. शेजारी राहणाऱ्या एका वृद्द महिलेस सांगितले.

सावित्री हिचा मृत्यू झाल्यानंतर आकाश धेंडे याने त्याच ओढणीने घरात स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान ही घटना दि.२१ जुलै रोजी उघडकीस आली.

या दुहेरी आत्महत्या प्रकाराची माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, अमोल गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही प्रेत ताब्यात घेतली.

त्यांचे चिंचोली माळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शविच्छेदन करून अंतिम संस्कारासाठी प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सावित्री ही कोल्हापूर येथून आकाश धेंडे याच्या सोबत पळून आली होती. सावित्री हिच्या पतीचेही काही दिवसांपूर्वी निधन झालेले असून तिला पहिल्या नवऱ्यापासून दोन मुले झालेली आहेत.

 

Back to top button