तीन शिक्षक जागीच ठार; चालत्या गाडीवर कोसळले झाड
वलखेड फाट्यावर चालत्या गाडीवर झाड कोसळून तीन शिक्षक जागीच ठार झाले. नाशिक कळवण रस्त्यावर दिंडोरी नजीक वलखेड फाट्यावर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चालत्या आर्टिगा वाहनावर झाड कोसळून झालेल्या अपघातात अलंगुन ता सुरगाणा येथील तीन शिक्षक जागीच ठार झाले.
याबाबतचे वृत्त असे की, आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एम. एच. एफ. एन. ०९९७ या पांढऱ्या रंगाच्या मारुती आर्टिगा वनीकडून नाशिककडे जात होती. दरम्यान, वलखेड फाट्यावर फॉर्च्यून कंपनी जवळ गाडी पोहचताच त्याच्यावर अचानक झाड कोसळले.
- नाशिक : ‘कोल्ड्रिंक्स’मध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार
- नाशिक : सावकी येथे घराची भिंत कोसळून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
या अपघातात गाडीच्या मागील सीटवर बसलेले तीन शिक्षक दत्तात्रय गोकुळ बच्छाव (वय ५१ ) राहणार किशोर सूर्यवंशी मार्ग दिंडोरी रोड नाशिक. रामजी देवराम भोये (वय ४९) नाशिक नितीन सोमा तायडे( वय ३२) रा रासबिहारी लिंक रोड नाशिक. हे जागीच ठार झाले.
गाडीत पुढच्या सीटवर बसलेल्या लोकांना किरकोळ जखम झाली आहे. मयत झालेले तीनही शिक्षक सुरगाना येथील शहीद भगतसिंग माध्यमिक विद्यालय अलंगुन येथील असल्याचे समजते.
- ओबीसी आरक्षण : पवार, ठाकरे, थोरात हे झारीतील शुक्राचार्य
- ‘मिस इंडिया युएसए 2021’ वैदेही डोंगरेचा आईसाठी खास संदेश
पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण गो दिंडोरी पोलीस करीत आहे.
हेही वाचले का?
- टोकियो ऑलिम्पिक : स्पर्धेतील सर्वात तरुण आणि वयस्कर खेळाडू कोण?
- ‘मिस इंडिया युएसए 2021’ वैदेही डोंगरेचा आईसाठी खास संदेश
- कोल्हापूरचा अनिकेत जाधव हैदराबाद एफसीकडून करारबद्ध
- शिरपूर : वीजेचा पुरवठा अचानक सुरु झाल्याने खांबावर चढलेल्या युवकाचा मृत्यू
पाहा व्हिडिओ : कोरोना मृतांच्या शववाहिकेचे स्टेअरिंग सांभाळणारी प्रिया