शिरपूर : वीजेचा पुरवठा अचानक सुरु झाल्याने खांबावर चढलेल्या युवकाचा मृत्यू | पुढारी

शिरपूर : वीजेचा पुरवठा अचानक सुरु झाल्याने खांबावर चढलेल्या युवकाचा मृत्यू

धुळे; पुढारी वृत्तसेवा :

वीजेचा पुरवठा बंद झाल्याने वीजेच्या खांबावर दुरुस्तीसाठी चढलेल्या एका युवकाचा अचानक वीज प्रवाह सुरु केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या युवकाचा मृत्यू संबंधित वीज कर्मचारी व शेतकरी यांच्यामुळेच झालेला असल्याचा आरोप करुन या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकाने केली आहे.

शिरपूर तालुक्यातील दहीवद शिवारात हा प्रकार घडला आहे. या शिवारात विजेचा पुरवठा खंडीत झाल्यामुळे यशवंत प्रभाकर कोळी यांना या भागात नेमणुकीस असणारे वीज कर्मचारी व संबंधीत शेतकरी यांनी विजेच्या खांबावर दुरुस्ती करण्यासाठी चढण्यास सांगितले.

तत्पूर्वी वीजेचा पुरवठा बंद करण्यात आला होता. खांबावर चढल्यानंतर विजेचा पुरवठा सुरु झाल्याने कोळी हे जमीनीवर कोसळले. यात त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकार संबंधीत शेतकरी व वायरमन यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप मयताचे काका दिलीप कोळी यांनी पोलिस प्रशासनास दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

मयत यशवंत कोळी यांना खांबवर चढण्यास प्रवृत्त करणाऱ्या ऋषिकेश बापुसिंग राजपूत, प्रतिक पाटील व योगेश लांडगे या वायरमन यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचले का?

पाहा फोटो : 

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button