दिंडोरी पोलिसांच्या धडक कारवाईत आठ लाखांचा अफू जप्त ; तिघांना अटक | पुढारी

दिंडोरी पोलिसांच्या धडक कारवाईत आठ लाखांचा अफू जप्त ; तिघांना अटक

दिंडोरी पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ठेपणपाडा येथे अफूच्या शेतीचा दिंडोरी पोलिसांनी पर्दाफाश केला असून सुमारे आठ लाखाची अफू जप्त करत याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. दिंडोरी तालुक्यातील ठेपणपाडा येथे अफूची शेती असल्याची गुप्त बातमी दिंडोरी पोलिसांना समजताच रविवारी दिंडोरी पोलिसांनी ठेपणपाडा शिवारातील शेत गट नंबर 22 मध्ये विनापरवाना बेकायदा स्वताच्या फायदयासाठी अफु या अमली पदार्थाच्या झाडाची लागवड केलेली दिसली. या शेतातील सर्व अफू दिंडोरी पोलिसांनी जप्त केली आहे.

यावेळी पांंढ-या प्लास्टीकच्या गोण्यांमध्ये वेगवेगळया वजनाच्या एकुण 43 गोण्या हिरवे अफुची झाडे मुळासकट भरण्यात आले. एकूण 803 किलो वजनाची सुमारे आठ लाख किमतीचा अफु दिंडोरी पोलिसांनी जप्त करून पोलीस बाळकृष्ण पजई यांच्या फिर्यादीवरून अंमली व औषधीद्रव्य मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 18 प्रमाणे शेतमालक कांतीलाल उर्फ रामचंद्र गोविंद ठेपणे (वय.38 ,) रा. ठेपणपाडा, ता. दिंडोरी, जि.नाशिक तसेच दिपक लालसिंग महाले (वय.42) मुळ रा. दुसाणे बडसाणे, ता. साक्री, जि. धुळे, ह.मु.कुश व बिल्डींग रूम नं. 11, आदर्श नगर, राऊ हॉटेलच्या मागे, पेठ रोड, नाशिक. तसेच मोहन वामन दळवी ( वय.36 वर्षे) मुळ रा. ठेपणपाडा, ता. दिंडोरी, जि. नाशिक, ह.मु. अथर्व रोहाऊस नं. 29 इंद्रप्रस्थनगर, पेठरोड नाशिक.यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड व पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलीस बाळकृष्ण पजई, एस.पी.धुमाळ आदी तपास करीत आहेत.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button