

कानपूर; पुढारी ऑनलाईन
उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ६ जणांना आपला जीव गमवावा लागला. शहरातील बाबूपुरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाटमिल चौकात अनियंत्रित झालेल्या भरधाव बसने अनेकांना चिरडले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वेगाने जात असलेल्या अनियंत्रित इलेक्ट्रिक बसने रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक प्रवाशांना चिरडले. त्यानंतर ही बस एका ट्रकवर आदळली. यामध्ये बारापेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात काही वाहनांचे तर अनेक दुचाकींचे नुकसान झाले आहे. याबाबत पोलीसांत गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्यावतीने प्रसारमाध्यमांना देण्यात आली.
तेलंगणामधील करीमनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलाचा कारवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात ४ महिला चिरडल्या गेल्या. कारच्या वेगाने हा अपघात घडला. कार वेगाने फुटपाथवरून जात असलेल्या चार महिलांच्या अंगावर गेली. पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला आहे.
हेही वाचा