देशात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा सुरुच; पॉझिटिव्हीटी रेट १४.५० टक्क्यांवर | पुढारी

देशात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा सुरुच; पॉझिटिव्हीटी रेट १४.५० टक्क्यांवर

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशात कोरोनाबाधितांची वाढ सुरुच आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २.३४ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, पॉझिटिव्हीटी रेट १४.५० टक्क्यांवर गेला आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १६५.७० कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. भारतात सध्या १८ लाख ८४ हजार ९३७ ॲक्टीव्ह केसेस आहेत.

त्याच वेळी, रिकव्हरी रेट ९४.२१ टक्क्यांवर आहे. गेल्या 24 तासांत ३ लाख ५२ हजार ७८४ लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. देशातील कोरोनामधून बरे होणाऱ्यांची एकूण संख्या ३ कोटी ८७ लाख १३ हजार ४९४ वर पोहोचली आहे. त्याच वेळी, आतापर्यंत एकूण ७२.७३ कोटी लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. गेल्या २४ तासात १६ लाख १५ हजार ९९३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत ८९३ मृत्यूची नोंद झाली आहे.

दरम्यान, अशात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देश राज्य,केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. देशात कोरोना तपासण्यांचा वेग देखील वाढवण्यात आला आहे.

Back to top button