अमेरिकेत 'बॉम्ब चक्रीवादळ'चा हाहाकार ! ७ कोटी लोक प्रभावित, अनेक ठिकाणी आणीबाणी | पुढारी

अमेरिकेत 'बॉम्ब चक्रीवादळ'चा हाहाकार ! ७ कोटी लोक प्रभावित, अनेक ठिकाणी आणीबाणी

न्यूयॉर्क; पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या पूर्वेकडील भागात शनिवारी हिमवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळामुळे या भागातील सुमारे सात कोटी लोकांना वीजपुरवठा खंडित करावा लागला आहे. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. राष्ट्रीय हवामान सेवा (NWS) ने एक अलर्ट जारी केला आहे. (bomb cyclone)

मॅसॅच्युसेट्सच्या काही भागात तीन फुटांपर्यंत बर्फ पडला आहे. सुमारे 1 लाख 17 हजार 000 घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. दिवसाच्या अखेरीस किनारी भागात एक फूट (30 सेमी) पेक्षा जास्त बर्फ पडण्याची अपेक्षा होती. न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि बोस्टनमधील वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन स्थिती जाहीर करून लोकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शनिवारी 3 हजार 500 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली.

न्यूयॉर्क आणि बोस्टनसारख्या शहरांमध्ये या वादळाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. वादळाचा प्रभाव लक्षात घेता, राष्ट्रीय हवामान सेवेने शनिवारी ‘बॉम्ब चक्रीवादळ’ ची पुष्टी केली आहे. बॉम्ब चक्रीवादळाचा प्रभाव खूप वेगवान आहे. जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील हवा वातावरणात वेगाने वाढते तेव्हा हे चक्रीवादळ तयार होते.

फ्लोरिडाच्या दक्षिणेला NWS ने थंडीचा इशारा जाहीर केला होता. वादळामुळे पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावरील गावे आणि शहरांना घरीच राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बर्फाच्या वादळात एक महिला तिच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळून आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मॅनहॅटनच्या उत्तरेला १० इंच बर्फ पडला होता. रेल्वेमार्ग अंशतः बंद होते. न्यूयॉर्क शहरातील रस्त्यांवर बर्फाचे तुकडे पडले आहेत. न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमधील लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्यास सांगण्यात आले आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button