आरक्षणाशिवायही नाशिक जिल्ह्यात २३ ओबीसी नगरसेवक; सहा नगरपंचायतींच्या निवडणूक निकालातील वास्तव | पुढारी

आरक्षणाशिवायही नाशिक जिल्ह्यात २३ ओबीसी नगरसेवक; सहा नगरपंचायतींच्या निवडणूक निकालातील वास्तव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; नुकत्याच झालेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करून, त्या जागा खुल्या पद्धतीने लढविण्यात आल्यात. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाशिवाय झालेल्या या निवडणुकांत नाशिक जिल्ह्यातील 102 जागांपैकी जवळपास 23 जागांवर ओबीसी प्रवर्गातील उमेदवार विजयी झाले आहेत.

जिल्ह्यात सहा नगरपंचायतींच्या निवडणुका नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणाशिवाय पार पडल्या. सुरुवातीला राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार निवडणूक आयोगाने ओबीसींना 50 टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण दिले होते. त्यानुसार 102 जागांवर 11 ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण होते. राज्य सरकारने इंपिरिकल डाटा एकत्र न करता, हे आरक्षण दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले होते. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडल्यामुळे या निवडणुकीत ओबीसी प्रवर्गाला प्रतिनिधित्व मिळणार नाही, अशी चर्चा राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती.

त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय कोणतीच निवडणूक नको, अशी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतींच्या निकालातून आरक्षणाशिवायही ओबीसी उमेदवार विजयी झाले असून, त्यांना जवळपास 25 जागांवर प्रतिनिधित्व मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने ओबीसींना 50 टक्क्यांच्या मर्यादेत 11 जागांवर आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने रद्द केल्यानंतरही ओबीसी प्रवर्गातील जवळपास 17 उमेदवार विजयी झाले असून, त्यातील सुरगाणा व पेठ येथे प्रत्येकी सहा नगरसेवक ओबीसी प्रवर्गातील आहेत. निफाडमध्ये तीन, दिंडोरीत दोन जण विजयी झाले आहेत.

खुल्या जागेवरही तेच उमेदवार गेल्या महिन्यात निवडणूक प्रक्रिया सुरू असताना, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले व तेथे नव्याने खुल्या जागांवर निवडणूक कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिलेत. प्रत्यक्षात ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनीच खुल्या प्रवर्गातूनही अर्ज भरले व त्यातीलच उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे या आरक्षण असल्याचा अथवा नसल्याचा काहीही फरक पडला नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील ओबीसी प्रतिनिधित्व 

देवळा- आरक्षित प्रभाग 03, प्रत्यक्षात विजयी 03

निफाड- आरक्षित प्रभाग 03, प्रत्यक्षात विजयी 05

दिंडोरी-आरक्षित प्रभाग 02, प्रत्यक्षात विजयी 02

पेठ-आरक्षित प्रभाग 01, प्रत्यक्षात विजयी 06

सुरगाणा- आरक्षित प्रभाग 01, प्रत्यक्षात विजयी 06

कळवण- आरक्षित प्रभाग 01, प्रत्यक्षात विजयी 01

हेही वाचा :

Back to top button