शाकाहारी लोकांना प्रोटिनसाठी ‘हे’ उपयुक्त

शाकाहारी लोकांना प्रोटिनसाठी ‘हे’ उपयुक्त

नवी दिल्ली : प्रोटिन्स म्हणजेच प्रथिने ही आपल्या शरीरातील एकप्रकारे 'बिल्डिंग ब्लॉक्स' असतात. विविध पेशींची डागडुजी करून नव्या पेशी तयार करण्यासाठी प्रोटिन्स मदत करतात. वजन नियंत्रित ठेवण्यापासून ते स्नायू मजबूत करण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी प्रोटिन्स आवश्यक असतात. शाकाहारी लोकांना प्रोटिन्स मिळविण्यासाठी आहारात जाणीवपूर्वक बदल करावे लागतात. त्यांना विविध शाकाहारी पदार्थांमधून प्रोटिन्सची पूर्तता करता येऊ शकते.

पनीर हा प्रोटिन्सचा चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमध्ये 18 ते 20 ग्रॅम प्रोटिन असते. पनीर अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये वापरले जात असते. शेंगदाण्यांमध्येही हेल्दी फॅटस् आणि प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात आढळतात. 100 ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये सुमारे 25 ग्रॅम प्रोटिन्स असतात. विविध प्रकारच्या डाळीही प्रोटिन्सचा चांगला स्रोत आहेत.

अर्धा कप पिवळ्या किंवा हिरव्या डाळींमध्ये सुमारे 8 ते 9 ग्रॅम प्रोटिन्स असतात. मूग, तूर, हरभरा डाळ अशा डाळींमधून प्रोटिन्स मिळतात. हरभरा, चणे, छोलेही प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. अर्धा कप हरभर्‍यांमध्ये सुमारे 7.25 ग्रॅम प्रथिने असतात. 28 ग्रॅम बदामांमध्ये 6 ग्रॅम प्रथिने आणि 14 ग्रॅम निरोगी चरबी आढळते. हिवाळ्यात येणारे मटार किंवा हिरवे ओले वाटाणेही प्रथिनांचे उत्तम स्रोत असतात. शंभर ग्रॅम वाटण्यांमध्ये 5.4 ग्रॅम प्रथिने असतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news