जळगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

जळगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
Published on: 
Updated on: 

जळगाव : वृत्तसेवा

रावेर तालुक्यातील मस्कावद येथील तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. तुषार पांडूरंग इंगळे (रा. मस्कावद ता. रावेर)  असे त्‍याचे नाव आहे.

तुषार इंगळे फोटोग्राफीचे काम करायचा. १७ जानेवारी रोजी सायंकाळी सावदा येथे मित्र विशाल वानखेडे यांच्यासोबत दुचाकीने ताे आला होता. रात्री ११ वाजेच्या सुमारास तुषार हा मित्र विशाल यांच्यासोबत दुचाकीने सावदा येथून मस्कावद येथे दुचाकीने घरी परतत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.  यात तुषार गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ नेण्यात असताना रस्त्यात त्याचा  मृत्यू झाला.

जिल्हा पेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एक महिन्यापूर्वीच तुषारच्‍या वडिलांचे निधन झाले होते. आता तुषारचा अपघातात मृत्यू झाल्याने इंगळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तुषारच्या पश्चात आई , पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news