‘सलामी’ कार्यक्रम, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उपस्थित राहणार

Urmila Matondkar
Urmila Matondkar

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

गुजरात, राजस्थान म्हणजे भारतीयांबरोबर परदेशी नागरिकांसाठी प्रेक्षणीय स्थळ आहे. पण या दोन्ही राज्यांची सीमारेषा लक्षात घेता, परकीय देश केव्हाही आक्रमण करु शकते. याच ठिकाणी भारतीय जवान सातत्याने कार्यरत असतात. अशा सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांसाठी यंदाही 'सलामी' हा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी काही कार्यक्रमांना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरही उपस्थित असणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कला पथकाचे प्रमुख संतोष परब यांनी दिली.

यावर्षी 'सलामी' हा कार्यक्रम १ मार्च ते १६ मार्च २०२२ या कालावधीत होणार आहे. राजस्थानातील जोधपूर, पोखरण, जेसलमेर, ब्रम्हसर, तनोट माता मंदिर, लोंगेवाला बॉर्डर, बबलीयानवाला बॉर्डर आणि गुजरात राज्यातील बाडमेर, तामलोर, नाराबेट दांतीवाडा, मेहेसाना, भुज, गांधीनगर या बॉर्डरवर 'सलामी' चे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी अशा विविध ठिकाणी ३२ कलाकार जाणार आहेत. यातील काही कार्यक्रमांना अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उपस्थित राहणार आहे, अशी माहिती, कला पथकाचे प्रमुख संतोष परब यांनी सांगितले.

भारतीय जवान देश स्वाभिमान आणि कर्तव्यनिष्ठा बाळगून देशाच्या सीमेवर अविरतपणे कार्यरत असतात. या जवानांची एक संध्याकाळ संगीत, लोकनृत्यांने बहरावी, फुलावी ही संकल्पना सफरसम्राट दिवंगत राजा पाटील यांच्या मनात २००२ मध्ये आली. तेव्हापासून ते आजतागायत भारतीय जवानांसाठी 'सलामी' हा या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुंबईतमधील मुक्ता इव्हेंट ॲड हॉस्पिटॅलीटी प्रा. लि. आणि एकता मंच संस्थांमार्फत या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

हा उपक्रम आणि संकल्पनेचे खासदार अरविंद सावंत हे प्रेरणास्थान आहेत. सुप्रिया सुळे, राहुल शेवाळे, हेमंत पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थाथी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, आमदार यामिनी जाधव, प्रिं. अजय कौल, प्रशांत काशीद, गोपाळ शेलार, बाळा खोपडे यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे संतोष परब यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news