दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय तयार | पुढारी

दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय तयार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

दहावी, बारावीच्या वार्षिक परीक्षा फिजिकल पद्धतीने घेतल्या जाऊ नयेत, अशा विनंतीच्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय तयार झाले आहे. पंधरापेक्षा जास्त राज्यांची परीक्षा मंडळे, आयसीएससी तसेच सीबीएससी मंडळाकडून फिजिकल पध्दतीने परीक्षा घेण्याची तयारी सुरु आहे, मात्र कोरोना संकटामुळे या परीक्षा फिजिकल पध्दतीने घेऊ नयेत, अशा असंख्य याचिका दाखल झालेल्या आहेत.

या प्रश्‍नी दाखल याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ करेल, असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सांगितले. आगामी बोर्ड परीक्षेसाठी वैकल्पिक मूल्यांकन पद्धतीचा अवलंब करावा, अशी विनंती याचिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केली आहे. गतवर्षी सीबीएसईसहित इतर मंडळे व राज्य मंडळांनी वैकल्पिक मूल्यांकन मानदंडावर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर यंदा वैकल्पिक मूल्यांकन मानदंड लावावे, असे विद्यार्थ्यांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ : 

 

Back to top button