दुष्काळासंदर्भातील धोक्यात देशात महाराष्ट्र देशात तिसरे | पुढारी

दुष्काळासंदर्भातील धोक्यात देशात महाराष्ट्र देशात तिसरे

आशीष देशमुख

पुणे : अतिवृष्टी, पूर, थंडी, उष्णता यांच्या लाटांसह वीज कोसळणे, हिमवर्षाव, धुळीचे वादळ असे 13 धोके दर्शवणारे देशाचे हवामान अ‍ॅटलास पुणे वेधशाळेच्या शास्त्रज्ञांनी तयार केले असून ते पुणे वेधशाळेच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे.
दुष्काळी धोक्यात देशात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशनंतर तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे.

बेळगाव : सीमावासीयांवरील अन्यायाविरूद्ध आवाज बनणार : खासदार डॉ. अमोल कोल्हे

यात तेरा धोक्यांचा अंदाज देणारी अ‍ॅटलासची वेब आवृत्ती तयार झाली आहे. यात थंडी, उष्णता, पूर, हिमवर्षाव, धुळीचे वादळ, गारा, वादळ, गडगडाट, धुके, जोरदार वारे, अतिवृष्टी, चक्रीवादळ, भूस्खलन, मालमत्तेचे नुकसान, उपजीविका आणि सेवांचे नुकसान, आर्थिक नुकसान किती होऊ शकते याचा आढावा घेतला आहे. त्याची भौगोलिक नकाशासह माहिती दिली आहे. यासाठी जीआयएस प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. ुुु.ळार्विीपश.र्सेीं.ळप/हरूरीवरींश्ररी या संकेतस्थळावर हा वेब अ‍ॅटलास उपलब्ध आहे.

काँग्रेसशिवाय आघाडी बनवायची असं कधीच म्हणालो नाही : संजय राऊत

दुष्काळी धोक्यातील राज्यनिहाय जिल्हे

देशात 27 जिल्ह्यांतील 32 टक्के लोकांना दुष्काळाचा धोका आहे. मध्य प्रदेशातील 19 जिल्हे, उत्तर प्रदेश 15, गुजरात 14, कर्नाटक 14, महाराष्ट्र 12, राजस्थान 12, बिहार 11, तेलंगणा 10, दिल्ली 9, ओडिशा 8, झारखंड 9, आंध— प्रदेश 6, आसाम 6 तर केरळ 6 जिल्हे दुष्काळग्रस्त आहेत.

Russia vs Ukraine : रशियाचे लष्करी टॅंक युक्रेनच्या दिशेने रवाना

13 प्रकारचे धोके असलेली राज्ये

  • दुष्काळ : हा धोका देशातील 87 टक्के जिल्ह्यांना असून 93 टक्के लोकसंख्येवर प्रभाव पाडणारा आहे.
  • देशातील 27 टक्के जिल्हे असुरक्षित असून त्यात 32 टक्के लोकसंख्या असुरक्षित आहे.
  • असुरक्षित राज्ये : मध्य प्रदेश सर्वात असुरक्षित राज्य असून 19 जिल्हे खूप उंचीवर आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशातील 15 जिल्हे, गुजरात 14 जिल्हे, कर्नाटकातील 14 जिल्हे असुरक्षित आहेत.
  • गडगडाटी वादळाचा धोका : देशातील 42 टक्के जिल्हे, 35 टक्के लोकसंख्येवर प्रभाव.
  • थंडीची लाट : 36 जिल्हे, 40 टक्के लोकसंख्या प्रभावित. उत्तर प्रदेश हे थंड लाटेसाठी सर्वात असुरक्षित राज्य असून 75 टक्के जिल्हे असुरक्षित आहेत.

हिंगोली : फेसबुक पोस्ट लिहून माजी खासदाराचा शिवसेनेला घरचा आहेर

  • पूर स्थिती : 30 टक्के जिल्हे, 41 टक्के लोकसंख्या प्रभावित. यातही आसाम हे सर्वात असुरक्षित राज्य.
  • धुळीचे वादळ : 15 जिल्हे आणि 19 टक्के लोकसंख्येला धोका. यातही उत्तर प्रदेश आघाडीवर.
  • चक्रीवादळ : 14 जिल्ह्यांतील 20 टक्के लोकसंख्येला धोका. यात तमिळनाडूतील 11 जिल्हे, आंध— प्रदेश 9 जिल्हे, ओडिशा 6, प. बंगालमधील 3 जिल्हे असुरक्षित.
  • उष्णतेची लाट : 13 जिल्हे, 15 टक्के लोकांना धोका. राजस्थानातील 15, आंध— प्रदेशातील 13 जिल्हे अतिसंवेदनशील.
  • गारपीट : 10 टक्के जिल्हे, 6 टक्के लोकांना धोका. उत्तराखंड, जम्मू कश्मीर असुरक्षित.
  • धुके : 8 टक्के जिल्हे, 7 टक्के लोकसंख्या प्रभावित. दिल्ली, हरियाना, प. बंगाल, मणिपूर सर्वाधिक संवेदनशील.
  • विजांचा कडकडाट : 6 जिल्हे आणि 4 टक्के लोकसंख्येला धोका.

Back to top button