

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा: नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे एका चोरट्याला चोरी करताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले; परंतु, पोलिसाच्या ताब्यात दिल्यानंतर त्याची तब्येत बिघडल्याने मृत्यू झाला. दिनेश चव्हाण असे चोरी करताना पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
कोपरखैरणे येथे आज शुक्रवारी (दि.१३) रोजी पहाटे साडेचार वाजता दिनेश चव्हाण या चोरट्याला नागरिकांनी चोरी करताना रंगेहाथ पकडले. यानंतर ही माहिती कोपरखैरणे पोलीसाना नागरिकांनी दिली.
पोलीसांनी घटनास्थळी भेट देवून चोरट्याला ताब्यात घेतले. यानंतर त्याला पोलीस ठाण्यात ठाणे अमंलदार बसत असलेल्या खोलीत बसविले.
त्याठिकाणी काही वेळेनंतर दिनेशला अस्वस्थ वाटू लागल्याने वाशी महापालिका रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले. त्याठिकाणी त्याचा मृत्यू झाला.
दिनेश चव्हाण याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीसांनी एडीआर दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली.
हेही वाचलंत का?