पुणे ; पुढारी वृत्तसेवा : टोळक्याने कार्तिकवर कोयत्याने वार केले होते. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान ससून रूग्णालयात कार्तिकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी, कोंढवा पोलिसांकडून मध्यरात्री तिघांना ताब्यात घेतले आहे. कार्तिक जाधव (वय 22, रा. कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कार्तिकचा मृत्यू या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक जाधव हा कोंढव्यातील रहिवासी असून, त्याच्यावर यापुर्वीच एका व्यक्तीच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, कार्तिक हा गुरूवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास येवलेवाडी परिसरात आला होता. त्यावेळी टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने वार केले.
या घटनेत तो गंभीर जखमी झाल्याने उपचाराठी त्यास तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले.
त्याच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी प्रारंभी खुनाचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता, त्यामध्ये आता खुनाचा गुन्हा दाखल होईल, असे पाटील यांनी सांगितले.