मुंबईत प्रसंगी सुरक्षा दलांची मदत घेणार : मुख्यमंत्री शिंदे

विक्रमी पाऊस पडल्याने सखल भागात पाणी साचले
 Chief Minister Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्‍थापन कक्षातून आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत ३०० मीमी पाऊस झाला आहे. कमी वेळेत विक्रमी पाऊस पडल्याने सखल भागात पाणी साचले आहे. याचा रेल्वे सेवेला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. दरम्यान, पाण्याचा निचरा करण्यासाठी अनेक पंप सुरू केले आहेत. पाण्याचा निचरा झाल्याने रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.८) पत्रकार परिषदेत दिली.

 Chief Minister Shinde
Railway News | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; मुंबई, शहापूर परिसरात अतिवृष्टी

Summary

  • मुंबईत ३०० मीमी पाऊस झाला आहे.

  • मुंबईत जास्त पाऊस पडल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला

  • रेल्वे, महापालिका, राज्य आपत्ती विभागाला सज्ज राहण्य़ाच्या सुचना

 Chief Minister Shinde
वरळी हिट अँड रन प्रकरण: मिहिर शहाविरोधात लुकआउट नोटीस

मुंबईत जास्त पाऊस पडल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता. रेल्वे लाईन खाली असलेल्या मायक्रायटनाचा फायदा होत आहे. एनडीआरएफच्या प्रमुखांना सर्व व्यवस्था करण्यास सांगितले आहे. प्रसंगी सुरक्षा दलांची मदत घेण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. रेल्वे, महापालिका, राज्य आपत्ती विभागाला सज्ज राहण्य़ाच्या सुचना दिल्या आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.

 Chief Minister Shinde
मुंबई : पूल कोसळला तसे सरकार कोसळेल : अंबादास दानवे

मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला.

 Chief Minister Shinde
खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांची क्लीन चिट

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुंबई शहर जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ‌ आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती विभागाच्या सचिव सोनिया सेठी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना महत्‍वाच्या सूचना केल्‍या. दरम्‍यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news