वरळी हिट अँड रन प्रकरण: मिहिर शहाविरोधात लुकआउट नोटीस

अपघात झाल्यापासून मिहीर शहा फरार
Warli Heat And Run Case
मुंबई हिट अँड रन प्रकरण Pudhari File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणात अटक केलेल्या राजेश शहा यांचा मुलगा मिहिर शहा याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. रविवारी रस्ता अपघात झाल्यापासून मिहीर शहा फरार झालेला आहे.

Warli Heat And Run Case
मुंबई : वरळीत हिट अँड रन; महिलेचा मृत्यू, कारचालक फरार

नेमका अपघात कसा झाला?

  • रविवारी (दि.7) वरळी परिसरात दुचाकीवरील महिलेला उडविले.

  • मिहीर शहाने त्याच्या बीएमडब्ल्यू कारने महिलेला धडक दिली.

  • यात महिलेचा मृत्यू, तर पती जखमी

Warli Heat And Run Case
मुंबई : वरळीत हिट अँड रन; महिलेचा मृत्यू, कारचालक ताब्यात

अपघातानंतर शहा फरार

रविवारी (दि.7) मुंबईतील वरळी परिसरात मिहीर शहाने दुचाकीवरून जात असलेल्या महिलेला त्याचा बीएमडब्ल्यू कारने धडक दिली. यामध्ये अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा पती जखमी झाला आहे. अपघातानंतर शहा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

फरार संशयित आरोपी मिहीर शहा दारूच्या नशेत होता.

घटनेच्या वेळी फरार संशयित आरोपी मिहीर शहा दारूच्या नशेत असल्याचा पोलिसांना संशय आहे. तो अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. वरळी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कार मालक आणि आरोपीचे वडील राजेश शहा आणि प्रवासी राजश्री राजेंद्र सिंह बिदावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. राजेश शहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत.

Warli Heat And Run Case
खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांची क्लीन चिट

सर्व काही कायद्यानुसार होईल: मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कायदा सर्वांसाठी समान असून कोणालाही सोडले जाणार नाही. या अपघातात सहभागी व्यक्ती शिवसेना नेत्याचा मुलगा आहे का, असे विचारले असता शिंदे म्हणाले, “कायदा सर्वांसाठी समान असून सरकार प्रत्येक प्रकरणाकडे एकाच दृष्टिकोनातून पाहते. या अपघातासाठी वेगळे नियम असणार नाहीत. सर्व काही कायद्यानुसार केले जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news