मुंबई : पूल कोसळला तसे सरकार कोसळेल : अंबादास दानवे

३ दिवसांच्या निलंबनानंतर दानवे आज अधिवेशनात
Opposition leader Ambadas Darve criticized the government
मुंबई : पूल कोसळला तसा सरकार कोसळेल : अंबादास दानवेPudhari Photo

मुंबई : पुढारी ऑनलाईन

हे सरकार स्‍वत:च्या विकासासाठी योजना राबवत आहे. जनतेच्या विकासासाठी योजना राबवण्याचा देखावा सरकार करत आहे. त्‍यामुळे पूल कोसळला तसे हे सरकार कोसळेल अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. शिवीगाळ प्रकरणानंतर झालेलं दानवेंचं निलंबन अखेर आज तीन दिवसांनी मागे घेण्यात आलं. त्‍यामुळे दानवेंनी आजपासून अधिवेशनाच्या कामकाजाला उपस्‍थिती लावली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्‍यांनी सरकारवर कडाडून टीका केली.

Opposition leader Ambadas Darve criticized the government
Weather Forecast | राज्यात आजपासून मुसळधारेचा अंदाज

त्‍यांच्यावर झालेल्‍या निलंबनाच्या कारवाईवर बोलताना, माझ्यावर उपसभापतींनी केलेली कारवाई एकांगी होती अशी भूमीका मांडली. मात्र काही हरकत नाही. मी तीन दिवसांचं जे राहिलं आहे. ते कसं भरून काढायचं आहे ते मला माहिती आहे. ते आज भरून काढू. जनतेंचे जे प्रश्न आहेत ते सभागृहात मांडू अशी भूमिका मांडली.

Opposition leader Ambadas Darve criticized the government
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसाव्यासाठी पाटसच्या श्री नागेश्वर मंदिरात दाखल

सभागृहात शिवीगाळ प्रकरणानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे तीन दिवसांसाठी निलंबन करण्यात आले होते. दरम्‍यान दानवे यांनी दिलगीरी व्यक्‍त केल्‍यानंतर त्‍यांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्‍यामुळे आज त्‍यांनी अधिवेशनाच्या कामकाजाला आपली उपस्‍थिती लावली. यावेळी विरोधकांनी महागाईच्या मुद्यावरून आक्रमक होत विधान भवनाबाहेर आंदोलन केलं. महागाईवरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news