Supriya Sule: शरद पवारांचा पक्ष हा त्यांना मिळालाच पाहिजे, पुढं कोणाला द्यायचा हा त्यांचा प्रश्न; सुप्रिया सुळेंचे सुचक वक्तव्य

Supriya Sule
Supriya Sulepudhari
Published on
Updated on

Supriya Sule On NCP: शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी शिवसेना ही काल आज आणि उद्या ही उद्धव ठाकरे यांचीच असणार आहे. निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय घेतला आहे असं म्हणाल्या.

Supriya Sule
MP Supriya Sule | राष्ट्रवादीत एकमत अवघड; भाजपला दिला निरोप

सुप्रिया सुळे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष फोडले हे चुकीचं होतं हे विरोधकही मान्य करतात आणि आम्ही देखील मान्य करतो. निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला आहे.

शिवसेनेच्या केसची चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची केस कुठंपर्यंत आली आहे याबाबत प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'आमची केस आजही चालू आहे पण आम्हाला तारीख मिळत नाही. आज तारीख मिळाली तर आजही सुप्रीम कोर्टात जाईन.'

Supriya Sule
Supriya Sule |‘एनडीएसोबत जाण्यासाठी ना त्यांचा मला फोन, ना माझा त्यांना फोन’ : सुप्रिया सुळे

यानंतर सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा पक्ष हा त्यांनाच मिळाला पाहिजे, संस्थापक सदस्य शरद पवारच आहेत. त्यांनी तो पक्ष कोणाला द्यावा हा त्यांचा अधिकार आहे असं सुचक वक्तव्य केलं.

Supriya Sule
Supriya Sule Car Accident: खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीचा अपघात; गुजरात मधल्या गाडीची धडक

सुप्रिया सुळे यांनी चाकण प्रश्नाबाबत देखील आपलं मत व्यक्त केल. त्या म्हणाल्या की, ज्या चाकणसाठी पवार साहेब एमआयडीसी केली. पण डबल इंजिन सरकारच्या काळात जे सुरू आहे ते चिंताजनक आहे.'

गरीब मुलांच्या नोकऱ्या जातात त्यावेळी चार्टर विमान तुमची कुठे जाता, नाशिकला तुम्हाला जाता येतं मग इकडे का जाता येत नाही असा प्रश्न देखील सुप्रिया सुळे यांनी विचारला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news