Supriya Sule Car Accident: खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीचा अपघात; गुजरात मधल्या गाडीची धडक

सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही
Supriya Sule Car Accident
Supriya Sule Car AccidentPudhari
Published on
Updated on

रायगड: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर शनिवारी संध्याकाळी छोटा अपघात झाला. माडप बोगद्या जवळ शेजारुन जाणारी किया कार , दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना खा.सूळे यांच्या गाडीला घासून पूढे गेली. सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. मी व माझे वाहन चालक दोघेही सुखरुप असल्याची माहिती खासदार सुळे यांनी स्वतः स्टेटस ठेवत दिली.

Supriya Sule Car Accident
Mumbai News: वडाळा पुनर्विकासावर अखेर पालिकेची मोहोर; प्रस्ताव बहुमताने मंजूर

आपल्या रस्त्यांवरील अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे असंख्य लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात. सीट बेल्ट लावा, सतर्क राहा आणि जबाबदारीने वाहन चालवा, जेणेकरून आपले महामार्ग सर्वांसाठी अधिक सुरक्षित राहतील, असे आवाहनही त्यांनी केले.

Supriya Sule Car Accident
South Mumbai water supply: दुसऱ्या दिवशीही मुंबईत पाणीबाणी

अजित पवार यांचा घातपात करण्यात आला त्याच पद्धतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला गुजरात मधल्या एका गाडीने अतिशय भयानकपणे टक्कर दिली. सुप्रिया सुळे देशाच्या नेत्या आहेत. अजित दादा नंतर सुप्रिया सुळे महत्त्वाच्या नेत्या आहेत. सुप्रिया सुळेंना अपघातात बरं वाईट करण्याचा हा प्रयत्न नव्हता ना अशी आमच्या मनात शंका आहे. राज्य सरकारने कसून चौकशी करावी अशी मागणी प्रवक्ते सुनिल माने यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news