Sunetra Pawar NCP conflict: 'मी पक्षाची प्रमुख, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची मला माहिती का दिली नाही?' सुनेत्रा पवारांचा तटकरेंना सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बुधवारी दुपारी 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी एक बैठक पार पडली.
Sunetra Pawar NCP conflict
Sunetra Pawar NCP conflictfile photo
Published on
Updated on

Sunetra Pawar NCP conflict

मुंबई : "मी पक्षाची प्रमुख असताना मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती मला का दिली नाही?" असा थेट सवाल राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्रमुख आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना केला. यावर, "शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावले होते," असे स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बुधवारी दुपारी 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, अनिल पाटील आणि सुनील तटकरे उपस्थित असल्याचे समजते.

Sunetra Pawar NCP conflict
Jayant Patil : मुख्यमंत्र्यांसोबतची ‘ती’ भेट ईश्वरपूर अपात्र नगराध्यक्षप्रकरणी

मंगळवारी मध्यरात्री उशिरा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासमवेत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली होती. या चौघांमध्ये झालेल्या बैठकीची माहिती पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना देण्यात आली नव्हती. बुधवारी 'देवगिरी'वर झालेल्या बैठकीत याच मुद्द्यावरून तीव्र नाराजी आणि चिंता व्यक्त करण्यात आली.

सुनेत्रा पवार यांनी थेट विचारणा केली की, "'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत पार पडलेल्या बैठकीबाबत पक्षाची प्रमुख म्हणून मला माहिती का दिली नाही?" त्यावर सुनील तटकरे यांनी सांगितले की, "आगामी पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे. या निर्णयाचा आपल्या पक्षाने दुसरा कोणताही अर्थ काढू नये, अशी कल्पना देण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली होती." मात्र, मुख्यमंत्र्यांना असा कोणताही संदेश द्यायचा होता, तर पक्षाची प्रमुख म्हणून मला आधी कल्पना का दिली नाही, असा सवाल सुनेत्रा पवार यांनी उपस्थित केला.

दरम्यान, शरद पवारांच्या पक्षाने 'एनडीए'सोबत जुळवून घेण्यासाठी केलेले प्रयत्न आणि पक्षाध्यक्ष निवडीला पक्षातूनच देण्यात आलेले आव्हान, या दोन्ही विषयांवर या बैठकीत सखोल चर्चा व चिंता व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Sunetra Pawar NCP conflict
Devendra Fadnavis: शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ४८ हजार कोटींची थकीत वीज बिलं माफ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news