Sunetra Pawar
Sunetra PawarPudhari

Sunetra Pawar NCP: सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी; 26 फेब्रुवारीला होणार अधिकृत घोषणा

देवगिरीवरील बैठकीत एकमत; विलीनीकरणाच्या चर्चांना वेग, शरद पवार गटासाठी धक्का?
Published on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची निवड होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी याबाबतची औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे.

Sunetra Pawar
Nitesh Rane : वने राहिली नाहीत तर वनमंत्री काय कामाचे?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरील नियुक्तीमुळे आता विलीनीकरणाचे सर्वाधिकार एकाच हाती येणार आहेत. हा निर्णय शरद पवार गटासाठी धक्कादायक समजला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करून त्यांनी कामालाही सुरुवात केली.

Sunetra Pawar
Farmer loan waiver: शेतकरी कर्जमाफीच्या दिशेने आणखी एक पाऊल; शासनाने मागविली थकीत कर्जदारांची माहिती, अर्थसंकल्पात घोषणा?

परंतु, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रश्न अनुत्तरित राहिला होता. उपमुख्यमंत्रिपद आणि कौटुंबिक जबाबदारी वाढल्यामुळे सुनेत्रा यांच्याऐवजी त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी पुढे आले होते. अखेरीस सोमवारी देवगिरी या सुनेत्रा पवार यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमत झाले.

Sunetra Pawar
सकाळी अजितदादांचा विमान अपघात; दुपारी संस्थांना अल्पसंख्याक दर्जा बहाल

मुंबईत 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर माध्यमांकडे आमदार किंवा पदाधिकाऱ्यांनी आपले स्वतंत्र मत मांडू नये, अशी सूचना देवगिरीमध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news