शिंदे, ठाकरे गटाने एकत्र यावे; ‘पुढारी न्यूज’च्या चर्चेत कीर्तिकरांचे आवाहन

शिंदे, ठाकरे गटाने एकत्र यावे; ‘पुढारी न्यूज’च्या चर्चेत कीर्तिकरांचे आवाहन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आणि शिवसेनेच्या लाखो कार्यकर्त्यांचे हित लक्षात घेता भविष्यात दोन्ही शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे, असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले पहिल्या फळीतील शिवसैनिक गजानन कीर्तिकर यांनी केले.

यासोबतच कीर्तिकरांनी मुंबई उत्तर पश्चिमच्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी या भ्रष्ट अधिकारी असल्याचा गंभीर आरोपही केला. त्यांचा हा आरोप सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर मानला जात आहे. कीर्तिकर यांनी 'पुढारी न्यूज'चे प्रतिनिधी पंकज दळवी यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत शिवसेनेचे एकत्रीकरण, अमोल कीर्तिकर यांचा पराभव आदी विषयांवर मतप्रदर्शन केले.

यावर्षी लोकसभा निवडणुकीत एका शिवसेनेचे 7 तर दुसर्‍या शिवसेनेचे 9 असे दोन्ही शिवसेनेचे एकूण 16 खासदार निवडून आले. गेल्यावेळेस शिवसेना अखंड असताना आमचे 18 खासदार निवडून आले होते. ताकद तीच. मात्र विभागली गेली. त्यामुळे लाखो शिवसैनिकांचे नुकसान झाले. राज्यात सिकंदर बनू शकेल एवढी ताकद शिवसेनेची आहे. त्यामुळे भविष्यात दोन्ही शिवसेनेने एकत्र यावे असे कीर्तिकर म्हणाले.

वंदना सूर्यवंशी भ्रष्ट अधिकारी मुंबई उत्तर पश्चिमच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांची पार्श्वभूमी भ्रष्टाचाराची आहे. जेव्हा एक उमेदवार कमी मताधिक्याने जिंकतो तेव्हा अन्य उमेदवाराचे समाधान करण्यासाठी फेरमोजणीची मागणी निवडणूक अधिकार्‍याने मान्य करायची असते. मात्र या प्रकरणात असे घडले नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news