नागपूर : दिघोरी टोलनाक्याजवळ सोमवारी मध्यरात्री फुटपाथवर झोपलेल्या खेळणी विकून उदरनिर्वाह करणार्या 9 जणांना मद्यधुंद कारचालकाने उडविल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी जखमींपैकी चार वर्षीय हसीना बागडीया या चिमुकलीचा मृत्यू झाला. यामुळे मृतकांची संख्या तीन झाली आहे.
या अपघातातील इतर 6 जण गंभीर जखमी आहेत. या 'हिट अँड रन' प्रकरणात हलगर्जीपणा करणारे वाठोडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय दिघे यांना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. मद्यधुंद विद्यार्थ्याने कार फुटपाथवर चढवून फुटपाथवर झोपी गेलेल्यांना चिरडले होते.