SBI bank closed 6 days: एसबीआयच्या सर्व शाखा सलग 6 दिवस बंद राहणार!

कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला जोडून सार्वजनिक सुट्ट्या
SBI cuts MCLR rates
SBI cuts MCLR rates (File photo)
Published on
Updated on

मुंबई: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या लाखो ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. एसबीआयच्या शाखा सलग सहा दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांची मोठी गैरसोय होणार आहे.

एसबीआयच्या कर्मचारी संघटनांनी 25 आणि 26 मे रोजी संपाची हाक दिली आहे. 25 मे हा सोमवार आहे आणि 26 मे हा मंगळवार आहे. यापूर्वी, 23 मे, चौथा शनिवार आणि

SBI cuts MCLR rates
Ashtagar heritage tourism Raigad: अष्टागराला मिळणार हेरिटेज पर्यटनाचा दर्जा

24 मे, रविवार रोजी बँका बंद राहतील. बकरी ईदमुळे अनेक राज्यांमध्ये 27 आणि 28 मे रोजी बँका बंद राहणार आहेत. परिणामी, एसबीआयच्या शाखा ग्राहकांसाठी एकूण सहा दिवस बंद राहतील.

या संपाद्वारे एसबीआयचे कर्मचारी त्यांच्या हक्कांचे संरक्षण, चांगले कामाचे वातावरण आणि त्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी करत आहेत. हा संप ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनने जाहीर केला आहे.

SBI cuts MCLR rates
Polytechnic Teacher Training: पॉलिटेक्निकच्या शिक्षकांना मिळणार विशेष प्रशिक्षण

फेडरेशनचा दावा आहे की कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे बऱ्याच काळापासून दुर्लक्ष केले जात आहे. शिवाय, अनेक करारांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. हा संप प्रामुख्याने कामगार प्रवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी असेल.

युनियनचा आरोप आहे, की बँकेतील अनेक निर्णय कर्मचाऱ्यांशी पूर्व सल्लामसलत न करता लागू केले जात आहेत, ज्यामुळे त्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news