Sambhaji Raje| चाकणकरांनी राजीनामा द्यावा : संभाजीराजे

नाशिक भोंदूबाबा प्रकरणी वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न येतो कुठे, असा सवाल शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
Sambhaji Raje on investigation
Sambhaji Rajepudhari photo
Published on
Updated on

मुंबई : नाशिकमध्ये तथाकथित भोंदू मांत्रिक अशोक खरात याला गंभीर अत्याचाराच्या आरोपांवरून अटक झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या खरातची पाद्यपूजा करतानाचा, या बाबाच्या डोक्यावर छत्री धरलेला फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आहे.

माजी खासदार संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात असे प्रकार घडणे धक्कादायक आहे. अशोक खरातवर झालेले आरोप अत्यंत गंभीर असून त्यांची कडक चौकशी होणे आवश्यक आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा संबंधित ट्रस्टवर असल्याची माहिती समोर आल्याने त्यांनी नैतिकता म्हणून तत्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून त्यांना पदावरून दूर करावे, असेही ते म्हणाले.

Sambhaji Raje on investigation
Zilla Parishad politics : झेडपीच्या सत्तेबाहेर ठेवल्याने शिवसेनेत नाराजी

रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहूच नये, त्यांच्यात थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी पद सोडले पाहिजे. नाशिक भोंदूबाबा प्रकरणी वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न येतो कुठे, असा सवाल शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

राऊत म्हणाले की, चाकणकर वादग्रस्त आहेत. त्यांना कोण आणि का वाचवतंय हा प्रश्न मला पडला आहे. नाशिकच्या भोंदूबाबाचे पाद्यपूजन करायला सत्ताधारी लोक जातात आणि गृहमंत्री डोळे बंद करून बसले आहेत. मंत्री, नेते जर अशा लोकांच्या पायाजवळ बसत असतील तर महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस पदावर का ठेवतात, असा सवाल त्यांनी केला.

Sambhaji Raje on investigation
Sanjay Raut | अशोक खरात प्रकरण एपस्टिन फाईल्सपेक्षा भयंकर, मुख्यमंत्री गप्प का : संजय राऊत

करुणा मुंडे यांचा उपोषणाचा इशारा

रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी करुणा मुंडे-शर्मा यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. चाकणकर यांना तत्काळ पदावरून दूर केले नाही, तर मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा स्पष्ट इशारा मुंडे यांनी दिल्याने राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.

मंत्री भरणे यांच्याकडून चाकणकर यांची पाठराखण

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात असताना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. मंत्री भरणे म्हणाले, सार्वजनिक जीवनात काम करताना आम्ही अनेकदा स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर विविध ठिकाणी जात असतो. समजा, एखाद्या गावी गेल्यानंतर तिथल्या सरपंचाने विनंती केली की, इथे महाराज आहेत, दर्शनाला जाऊया, तर आम्ही श्रद्धेपोटी तिथे जातो. आता ते महाराज चांगले आहेत की तुमच्या भाषेत भोंदू हे आम्हाला कसे कळणार? आम्ही स्वतःहून तिथे गेलेलो नसतो. त्यामुळे केवळ भेटीवरून किंवा फोटोंवरून रूपाली चाकणकर यांना दोषी धरणे पूर्णपणे चुकीचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news