Panvel Municipal Election: पनवेलमध्ये निवडणूक रणसंग्राम; 343 उमेदवार रिंगणात, 122 अपक्षांची निर्णायक भूमिका

महानगरपालिका निवडणुकीत बहुकोनी लढतींची शक्यता; अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना वेग
Panvel Municipal Election
Panvel Municipal ElectionPudhari
Published on
Updated on

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर निवडणूक रिंगणाचे चित्र काही अंशी स्पष्ट झाले आहे. एकूण 343 उमेदवार निवडणूक मैदानात असून, त्यापैकी तब्बल 122 उमेदवार अपक्ष असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

Panvel Municipal Election
Navi Mumbai ward 17A election: अपक्ष उमेदवार भाजपच्या गोटात; प्रभाग 17 अ मध्ये राजकीय डावपेच

आज, 2 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने दिवसभर राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

मुख्य राजकीय पक्षांसह स्थानिक आघाड्या आणि मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार मैदानात उतरल्याने अनेक प्रभागांत बहुकोनी लढती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपक्ष उमेदवारांची वाढलेली संख्या ही पनवेल निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरत असून, स्थानिक प्रश्नांवर थेट मतदारांशी संवाद साधत हे उमेदवार प्रचारात सक्रिय झाले आहेत. यामुळे काही प्रभागांत पक्षीय उमेदवारांसमोरही कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Panvel Municipal Election
Aditya Amit Thackeray: ठाकरेंच्या पोरांचा अभ्यास पक्का...? PPT प्रेझेंटेशन सादर करून BMC Election उमेदवारांच्या अंगात भरलं बळ

अर्ज माघारीची अंतिम मुदत 3 जानेवारीपर्यंत असल्याने शेवटच्या क्षणी अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. काही उमेदवार आपले अर्ज मागे घेतील, तर काही ठिकाणी राजकीय समजूतदारपणा, दबावतंत्र किंवा स्थानिक समीकरणांमुळे अनपेक्षित निर्णय घेतले जाण्याचीही चर्चा आहे. अर्ज माघारीनंतरच अंतिम उमेदवारांची यादी निश्चित होणार असून त्यानंतर प्रचाराला अधिक वेग येणार आहे.

Panvel Municipal Election
Mumbai Political Realignment: राजकीय वैरी बनले मित्र; मुंबईत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चा नवा अध्याय

दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत मोठ्या आर्थिक उलाढालीची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा सुरू असून, लाखो रुपयांची देवाणघेवाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी कुजबुज शहरभर ऐकू येत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Panvel Municipal Election
Shinde Group Ticket Dispute: शिंदे गटात तिकीट वाटपावरून असंतोष; संजू वाडेंचा नेतृत्वावर हल्लाबोल

एकूणच 343 उमेदवारांचे रिंगण, त्यामध्ये 122 अपक्षांची महत्त्वाची उपस्थिती आणि आजची अर्ज माघारीची अंतिम तारीख यामुळे पनवेल महानगरपालिका निवडणूक 2026 निर्णायक व रंगतदार ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news