

Aditya Amit Thackeray BCM Election: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख होती. मात्र आजच्याच दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या उमेदवारांसाठी मेळावा आयोजित केला होता. हा मेळावा शिवसेना भवनात करण्यात आला होता.
त्यावेळी शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि मनसेचे अमित ठाकरे यांनी उमेदवारांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून मार्गदर्शन केलं. यावेळी दोन्ही ठाकरे बंधू स्टेजवर राहुल गांधी स्टाईलने माहिती देत होते. आदित्य ठाकरे यांनी आपलं महानगरपालिकेसाठीचा फ्युचर प्लॅन काय आहे याची थोडक्यात माहिती उमेदवारांना दिली.
पीपीटी प्रेझेंटेशन करताना आदित्य ठाकरे युतीच्या उमेदवारांना म्हणाले, 'आता उमेदवार आहात १६ तारखेला निवडून यायचे आहे. आपण ३ पक्ष एकत्र आलोय. समोरून सगळं काही वापरलं जात आहे. आपल्याकडं फक्त मन आहे. त्यांच्याकडे धन आहे. धमक्या आहेत.'
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, 'काल दानवे यांनी देखील काही गोष्टी सांगितल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात रोज चर्चा होत आहे. मुंबई वाचवण्यासाठी लढायचं आहे. मुंबई वाचवायची असेल तर ते सगळं हाताळणार आहेत.
मी आणि अमित इंथ वेगळे विषय मांडणार आहेत. लवकरच वचननामा येणार आहे. त्यातील काही मुद्दे तुम्ही सुद्धा द्या.'
आदित्य ठाकरे यांनी युतीच्या उमेदवारांना प्रचाराला गेल्यावर काय मुद्दे मांडयाचे याचे देखील मार्गदर्शन केलं. ते म्हणाले. 'तुम्ही प्रचारात जाल तेव्हा तुम्हाला विचारले जाईल कशा साठी आलात ..आम्ही काही १५ गोष्टी काढल्या आहेत. हे मुद्दे आम्ही मांडणार आहे. वचननामा येणार आहेच पण हा एक वर्कशॉप आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला जनतेपर्यंत पोहचवायच्या आहेत.'
त्याआधी मला तुमचे अभिनंदन करायचं आहे. काही सहकाऱ्याचे आभार मानायचे आहेत कारण त्यांनी आपले कोणतेही कार्यलाय फोडले नाही. एबी फॉर्म गिळला नाही. शिवीगाळ केली नाही. ही खरी निष्ठा असते. त्यामुळे मला सर्वांचे धन्यवाद मानायचे आहेत. असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी टोलेबाजी केली.
आदित्य ठाकरे यांनी मुंबईची जमीन मुंबईकरांसाठी, आरोग्य, परिवहन सार्वजिनक आरोग्य यााबबत पीपीटी प्रेझेंटेशन करून आपण काय प्रचार करायचा आहे आणि लोकांना आपण काय आश्वासन देणार आहोत. आपले काय व्हिजन आहे याचे मार्गदर्शन केलं.