Navi Mumbai ward 17A election: अपक्ष उमेदवार भाजपच्या गोटात; प्रभाग 17 अ मध्ये राजकीय डावपेच

नीलेश भोजनेंचा अर्ज बाद; दर्शन भोईर भाजपचे पुरस्कृत उमेदवार घोषित
Devendra Fadanvis
Devendra FadanvisPudhari
Published on
Updated on

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 अ मधून भाजपचे अधिकृत उमेदवार नीलेश भोजने यांचा नामनिर्देशन अर्ज छानणीत बाद झाल्याने भाजपची मोठी अडचण झाली होती. मात्र त्यांनी आपला पुढचा डाव टाकत तत्काळ या प्रभागातील अपक्ष उमेदवार दर्शन भोईर यांचा पक्षात प्रवेश करून त्यांना भाजपचा पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.

Devendra Fadanvis
Aditya Amit Thackeray: ठाकरेंच्या पोरांचा अभ्यास पक्का...? PPT प्रेझेंटेशन सादर करून BMC Election उमेदवारांच्या अंगात भरलं बळ

नामनिर्देशन अर्ज बाद झाल्याने प्रभाग 17 अ मधील भाजपची उमेदवारी संकटात सापडली होती. मात्र, पक्षाने वेळ न दवडता रणनीती बदलत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दर्शन भोईर यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपने या प्रभागात आपला पॅनल उभा केला असून, थेट शिवसेना (शिंदे गट) यांच्या उमेदवारांविरोधात लढत देण्याची तयारी दर्शवली आहे. यावेळी भाजपच्या नेत्याकडून स्पष्ट करण्यात आले की, ‌‘पक्ष संघटना व कार्यकर्त्यांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी आणि प्रभागातील विकासकामांचा अजेंडा पुढे नेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर दर्शन भोईर यांनी पक्षप्रवेशानंतर भाजपच्या विचारधारेनुसार काम करून मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, या घडामोडीमुळे प्रभाग 17 अ मधील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

Devendra Fadanvis
Mumbai Political Realignment: राजकीय वैरी बनले मित्र; मुंबईत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चा नवा अध्याय

839 अर्ज वैध, 117 अवैध

नवी मुंबई महानगरपालिका निडणुकीसाठी सर्व प्रभागांतील उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली असून 839 अर्ज वैध तर 117 अर्ज अवैध ठरले. एकूण 956 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. नेरूळ विभागात सर्वाधिक 28 अर्ज अवैध ठरले असून घणसोली विभागात तब्बल 39 अर्ज बाद झाले आहेत. याच्या तुलनेत वाशी विभागात अत्यंत काटेकोर तयारीमुळे आणि अचूक कागदपत्रांच्या पूर्ततेमुळे अवघा एकच अर्ज बाद झाल्याचे स्पष्ट होते. आता माघार प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

Devendra Fadanvis
Shinde Group Ticket Dispute: शिंदे गटात तिकीट वाटपावरून असंतोष; संजू वाडेंचा नेतृत्वावर हल्लाबोल

नवी मुंबईतील बंडोबा

रिंकू यादव : प्रभाग - 1, भाजप

मारुती यादव : प्रभाग - 1, उबाठा

प्रथमेश आरुटे : प्रभाग - 1, उबाठा

शितल शिंदे : ऐरोली, भाजप

विजय लिलके : प्रभाग - 1, शिंदे गट

संजू वाडे : प्रभाग - 3, शिंदे गट

शाम कोटकर : प्रभाग - 3, भाजप

Devendra Fadanvis
Thane Ganja Seizure: कळवा-खारेगाव टोलनाक्यावर 638 किलो गांजा जप्त; ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई

वैशाली पाटील : प्रभाग - 3, भाजप

साहिल चौगुले : प्रभाग - 3, शिंदे गट

अशोक तावडे : प्रभाग - 5, शिंदे गट

मोहन सोमवशी : प्रभाग - 5, शिंदे गट

जया औरदे पाटील : प्रभाग - 5, शिंदे गट

सरोजिनी नायडू : अपक्ष, नेरुळ भाजप

पांडुरंग आमले : अपक्ष, सानपाडा, भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news