पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील मविआ सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी अखेरपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभी असून, ठाकरेंना सर्व सहकार्य करणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेली बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे, जयंत पाटील म्हणाले, शिवसेना एकसंघ रहावा हीच आमची इच्छा आहे. गुवाहाटीतील शिवसेना आमदार परत येतील. सरवणकर, कुडाळकर गुवाहाटी गेले याचेच मला आश्चर्य वाटत आहे. पण लवकरच मविआतील गेलेले आमदार पुन्हा पक्षात परत येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादीने सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलावले असून मविआ वाचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.