नांदेड: काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर, तर भाजपमध्ये उत्साहाला उधाण

नांदेड: काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर, तर भाजपमध्ये उत्साहाला उधाण
Published on
Updated on

नांदेड: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस पक्षाच्या बाजूने सहभाग दिसत असला, तरी त्यांना आणि त्यांच्या पक्षाला महत्त्वाच्या कालखंडात सत्तेबाहेर जावे लागणार असल्याच्या चर्चेमुळे कार्यकर्ते आणि चव्हाण समर्थक सैरभैर झाले आहेत, तर दुसर्‍या बाजूला खा. प्रताप पाटील चिखलीकर आणि भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येत आहे. या उत्साहातच भाजपने बुधवारी जिल्हा कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन उरकून घेतले.

गेल्या सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या एका उमेदवाराचा पराभव करून भाजपने आघाडीला धक्का दिला आणि त्यातून सावरण्यापूर्वीच शिवसेनेत मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व बंड झाले, त्यात जिल्ह्यातील सेनेचे एकमेव आमदार बालाजी कल्याणकर हेही सहभागी असल्याचे दिसून आल्यावर नांदेडचे नाव चर्चेमध्ये आले आहे.

परिषद निवडणुकीनंतर मंगळवारपासून मंत्री अशोक चव्हाण यांनी काही बैठका निश्‍चित केल्या होत्या. नांदेड शहर आणि जिल्ह्याशी संबंधित वेगवेगळी कामे मार्गी लावत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आपल्या पक्षासाठी पोषक वातावरण तयार करण्याचा चव्हाणांचा बेत होता; पण सरकारच अस्थिर झाले आणि त्यातून तोडगा निघण्याची बाब अशक्य बनल्यामुळे काँग्रेसच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे.

जिल्ह्यात 10 नगर परिषदा, नांदेड जि.प. आणि 16 पंचायत समित्यांसह नांदेड-वाघाळा शहर मनपाची निवडणूक पुढील काही महिन्यात होऊ घातली असून राज्यातील सत्तेच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कामांच्या बळावर उक्‍त संस्थांमध्ये काँग्रेसचे पूर्वीचे अव्वल स्थान कायम राखण्याचा चव्हाण आणि त्यांच्या राजकीय साथीदारांचा मनोदय होता. या सर्वांनी प्राथमिक तयारीही सुरू केली होती; पण मोक्याच्या क्षणी सत्तेला सुरुंग लागल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक, जि.प. व पंचायत समित्यांसाठी इच्छुक असलेले उमेदवार या सार्‍यांमध्ये चिंतेचे ढग दाटले असून कठीण काळामध्ये पक्ष अभेद्य राखण्याचे आव्हान चव्हाण आणि भास्करराव खतगावकर यांच्यापुढे आता निर्माण होणार आहे.

अशोक चव्हाणांच्या व्यापक प्रभावामुळे भाजपसह इतर पक्षांचे स्थानिक नेते गेल्या अडीच वर्षांत निष्प्रभ झाले होते. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव करून चव्हाण यांनी खा. चिखलीकर यांचा प्रभाव संपुष्टात आणला होता. राजकीय आघाडीवर तेव्हापासून 'बॅकफूट'वर गेलेल्या चिखलीकरांना राज्यातील नव्या आणि संभाव्य राजकीय घडामोडींना नवा उत्साह आणि नवी उमेद दिली असून, त्यांच्याकडील थंडावलेली वर्दळ आता वाढली आहे. शिवसेनेचे एकमेव आमदार बालाजी कल्याणकर यांना पक्षनेतृत्वाने काही
कामांमध्ये मोठी मदत केली, तरी स्थानिक पातळीवर काँग्रेसच्या पालकमंत्र्यांनी त्यांच शक्य तेथे उपेक्षा केली.

या अनुभवामुळे ते खचले होते; पण मोठे बंड करताना मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणकरांचे पालकत्व स्वीकारल्यामुळे ते त्यांच्यासोबत गेल्याचे स्पष्ट झाल्यांनतर या पक्षातही आता येथे दोन गट निर्माण होणार आहेत. खा. चिखलीकरांच्या परिवारात बुधवारी एक कौटुंबिक कार्यक्रम होता. राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये भाजपला 'अच्छे दिन' येण्याची आशा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर चिखलीकरांकडे भाजप नेतेकार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेत येणार, असे कार्यकर्ते सांगत होते. तत्पूर्वी भाजपच्या जिल्हा कार्यालयाच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. तेथे प्रमुख नेते हजर होते पक प्रभावामुळे भाजपसह इतर पक्षांचे स्थानिक नेते गेल्या अडीच वर्षांत निष्प्रभ झाले होते. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव करून चव्हाण यांनी खा. चिखलीकर यांचा प्रभाव संपुष्टात आणला
होता.

राजकीय आघाडीवर तेव्हापासून 'बॅकफूट'वर गेलेल्या चिखलीकरांना राज्यातील नव्या आणि संभाव्य राजकीय घडामोडींना नवा उत्साह आणि नवी उमेद दिली असून, त्यांच्याकडील थंडावलेली वर्दळ आता वाढली आहे. शिवसेनेचे एकमेव आमदार बालाजी कल्याणकर यांना पक्षनेतृत्वाने काही कामांमध्ये मोठी मदत केली, तरी स्थानिक पातळीवर काँग्रेसच्या पालकमंत्र्यांनी त्यांची शक्य तेथे उपेक्षा केली. या अनुभवामुळे ते खचले होते; पण मोठे बंड करताना मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणकरांचे पालकत्व स्वीकारल्यामुळे ते त्यांच्यासोबत गेल्याचे स्पष्ट झाल्यांनतर या पक्षातही आता येथे दोन गट निर्माण होणार आहेत.

खा. चिखलीकरांच्या परिवारात बुधवारी एक कौटुंबिक कार्यक्रम होता. राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये भाजपला 'अच्छे
दिन' येण्याची आशा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर चिखलीकरांकडे भाजप नेतेकार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेत येणार, असे कार्यकर्ते सांगत होते. तत्पूर्वी भाजपच्या जिल्हा कार्यालयाच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन करण्यात
आले. तेथे प्रमुख नेते हजर होते. काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर, तर भाजपमध्ये उत्साहाला उधाण!

आ. राजेश पवार सक्रिय!

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे नायगावचे आमदार राजेश पवार हे मुंबईतच असून पक्षांतर्गत घडामोडींमध्ये ते सक्रिय असल्याचे दिसून आले. त्याआधी निवडणूक प्रक्रियेत पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी पवारांवर काही कामे सोपविली होती. ती त्यांनी पार पाडल्यावर फडणवीस यांनी त्यांचे कौतुकही केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news